महाराष्ट्र

Amravati Airport : अमरावतीच्या आकाशात इतिहासाचे पंख

Vidarbha : विमानतळाच्या स्वप्नाला नवी दिशा

Author

अमरावतीने इतिहास रचला. अमरावतीत प्रथमच एटीआर-72 चाचणी विमानाचे यशस्वी लँडिंग झाले, ज्यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून, लवकरच अमरावतीकरांना हवाई सेवेसाठी थेट जोडणी मिळण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असलेल्या अमरावती शहराने आज 30 मार्च रोजी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. प्रथमच एटीआर-72 प्रकारच्या विमानाचे चाचणी लँडिंग यशस्वीरीत्या पार पडले आहे. यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. खासदार नवनीत राणा यांनी विमानतळाच्या प्रगतीसाठी निजी प्रयत्न केले होते. नवनीत राणांच्या प्रयत्नांना यश मिळाले दिसून येत आहे. अमरावतीच्या हवाई सेवेसाठी हा सुवर्णक्षण ठरला आहे.

अमरावतीसारख्या विकसित होत असलेल्या शहराला हवाई मार्गाने जोडणे ही स्थानिकांसाठी मोठी सुविधा असेल. आज झालेल्या चाचणी उड्डाणामुळे शहराच्या हवाई सेवेला गती मिळेल आणि भविष्यात नियमित प्रवासी वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांसाठी प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असून, उद्योग, व्यापार आणि पर्यटनाच्या क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध होईल.

Mohan Bhagwat : मोदींच्या उपस्थितीत उलगडले स्वयंसेवेचे तत्त्वज्ञान

सातत्यपूर्ण संघर्ष

अमरावतीसाठी विमानतळ सुरू करण्याच्या मागणीसाठी नवनीत राणा यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रखरपणे प्रयत्न केले. केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी या विमानतळाच्या विकासासाठी निधी मिळवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झालेले दिसून येत आहे. आज अमरावतीच्या भूमीवर एटीआर-72 विमान यशस्वीरीत्या उतरले आहे. विमानतळाच्या विकासामुळे संपूर्ण विदर्भाला लाभ होईल. अमरावतीच्या औद्योगिक क्षेत्राला गती मिळेल. शैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटनालाही चालना मिळेल. नागपूरनंतर विदर्भात आणखी एक महत्त्वाचे हवाई केंद्र निर्माण होत असल्याने रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

एटीआर-72 विमानाने पहिल्यांदाच अमरावती विमानतळावर लँडिंग केले. नागपूर, मुंबई आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होण्याची शक्यता. नवीन टर्मिनल, विस्तारित धावपट्टी आणि इतर सुविधा विकसित करण्याचे नियोजन सुरू. या ऐतिहासिक घटनेनंतर अमरावतीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हवाई प्रवासाची सुविधा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे. उद्योगपती, व्यापारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

ऐतिहासिक यशामुळे अमरावतीने विमानसेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. लवकरच प्रवाशांसाठी सुविधा सुरू होण्याची अपेक्षा आहे. अमरावतीकरांसाठी ही नवी संधी आणि विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे. अमरावतीसाठी हा सुवर्णक्षण असून, लवकरच हे शहर हवाई नकाशावर ठळकपणे उमटेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!