महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : शब्द शस्त्र अन् कवच, विधानसभेत न्याययात्रा विजयी

Bhadravti : भद्रावतीच्या मातीतून उठलेला आवाज अखेर सरकारपर्यंत पोहोचला

Author

कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात ठाम आवाज उठवला. त्यांच्या विनंती अर्जाला मान्यता मिळून शेतकऱ्यांच्या आशेला विधीमंडळाच्या दारातून नवा उजेड मिळाला आहे.

कोळसा खाण प्रकल्पाच्या काळकुट साचात अडकलेल्या भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचे भविष्य अखेर उजळले. शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या आशा-अपेक्षांना न्यायाच्या चांदण्यात बदलणारा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच राज्य विधिमंडळात झाला. या निर्णायक विजयामागे एकच नाव आहे ते म्हणजे, माजी सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार.

कोणत्याही वाजतगाजत घोषणा न करता, राजकीय आक्रमकतेच्या गदारोळात हरवलेले हे प्रश्न पुन्हा एकदा विधिमंडळात आवाज बनून घुमले, तेही शांत, अभ्यासपूर्ण आणि ठाम शब्दांत. भद्रावती तालुक्यातील अरबिंदो अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पामुळे भूसंपादन झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे हक्क अजूनही अधांतरी होते. योग्य मोबदला, पुनर्वसन, मूलभूत सुविधा, हे सर्व मुद्दे सरकारदरबारी दुर्लक्षित होते.

कार्यवाहीसाठी विनंती

आमदार सुधीर मुनगंटीवारांनी आपल्या कौशल्याने आणि लोकहितस्नेही दृष्टिकोनाने या मुद्द्यांना पुन्हा एकदा हक्काचा आवाज दिला. त्यांनी केलेला विनंती अर्ज विधानसभेत मांडण्यात आला आणि सभापती महोदयांनी त्याची गंभीर दखल घेत तो विनंती अर्ज मान्य केला. या अर्जाची आता पुढील कार्यवाहीसाठी विनंती अर्ज समितीकडे सुपूर्तता झाली असून, हा एक ऐतिहासिक टप्पा ठरतोय भद्रावतीच्या शेतकऱ्यांसाठी.

कोळशाच्या काळ्या झाऱ्यांमध्ये जळणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांना पुन्हा एकदा पाण्याची धार मिळाली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना सभागृहात अधिकृत मान्यता मिळाल्याने, शासनावर आता सकारात्मक दबाव निर्माण झाला आहे. भूसंपादनातील अन्याय, अनियमित मोबदला, पायाभूत सुविधांचा अभाव, यावर आता शासनाला उत्तर द्यावं लागणार आहे.

Abhijit Wanjarri : नागपुरात पाण्याच्या लाटेत सरकारचं पॅकेज विरघळलं

शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा

शेतकऱ्यांचे हे प्रश्न केवळ प्रशासनाचे अपयश नव्हते, तर ही एका संपूर्ण भागाची झीज होती. आमदार मुनगंटीवार यांनी हे स्पष्ट जाणले होते आणि म्हणूनच त्यांनी हा मुद्दा गाळात रुतू दिला नाही. सभागृहात त्यांनी मांडलेले मुद्दे निखळ अभ्यासपूर्ण आणि ठोस होते. सरकारला केवळ मागण्या नव्हे, तर उपाययोजना सुचवणारी त्यांची भूमिका संसदीयतेचा सर्वोच्च आदर्श होती.

भद्रावतीतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकरी वर्ग आज भावूक झाले आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांना जेव्हा विधिमंडळात मान्यता मिळते, तेव्हा ती केवळ सरकारची कृपा नसते, ती एका लोकप्रतिनिधीच्या कणखर नेतृत्वाची फलश्रुती असते. मुनगंटीवार हे आमचं पाठबळ आहेत, आमचा आत्मविश्वास आहेत, असे उद्गार ग्रामस्थांनी काढले.

सुधीर मुनगंटीवार हे केवळ नेते नाहीत, तर चंद्रपूरच्या जनतेसाठी लढणारे एक श्रद्धास्थान ठरले आहेत. त्यांनी दिलेली ही संसदीय लढाई म्हणजे लोकशाहीतील प्रतिनिधी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण. भद्रावती तालुक्याच्या मातीतून उगवलेला संघर्ष आज विधिमंडळात ‘अर्ज’ रूपात फुलला. आता शासनाला ठोस पावलं उचलावीच लागतील. शेतकऱ्यांच्या आशा, विश्वास आणि संघर्षाचा हा विजय आहे आणि त्यामागे उभा आहे एक ठाम नेता, आमदार सुधीर मुनगंटीवार.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!