महाराष्ट्र

MMC Elections : मुनगंटीवारांचे निकटवर्तीय उतरले मेडिकल निवडणुकीत

Maharashtra : वैद्यकीय क्षेत्रात मंगेश गुलवाडे आजमावतील भाग्य

Author

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (MMC) 2025 निवडणुकीसाठी मतदानाची तारीख ठरली आहे. यामध्ये विदर्भातील उमेदवारांपैकी सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या एका नेत्याचाही समावेश आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (MMC) 2025 निवडणुकीसाठी 3 एप्रिल रोजी राज्यभर मतदान होणार आहे. या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील नोंदणीकृत डॉक्टर आपल्या हक्काचा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामध्ये उमेदवारांपैकी विदर्भातील काही नेत्यांचा समावेश आहे. यात राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंगेश गुलवाडे उमेदवारांपैकी एक आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांचे एक निकटवर्तीय सध्या आमदार आहेत. तर दुसरे निकटवर्तीय मंगेश गुलवाडे हे वैद्यकीय निवडणुकीतून आपले भाग्य आजमावणार आहेत. वैद्यकीय परिषद निवडणुकीत गुलवाडे विदर्भातील उमेदवारांपैकी एक आहेत. वैद्यकीय परिषदेचे पद जरी राजकीय आमदाराच्या बरोबरीचे नसले तरी ते प्रतिष्ठित पद आहे. त्यामुळे या पदालाही महत्त्वाचे मानले जाते.

Parinay Fuke : संसदेत लागणार ठाकरेंच्या हिंदुत्वाचा कस

विदर्भातील उमेदवार

वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये विदर्भातील काही उमेदवार आहेत. यात संजय देशपांडे, नागपूर, मंगेश मधुकर गुलवाडे (भाजप नेते, चंद्रपूर), धीरज गुप्ता, नागपूर, अरुण हूमने, नागपूर, मंदार साने, नागपूर यांचा समावेश आहे. यामध्ये मंगेश गुलवाडे चंद्रपूरमधील भाजप नेते आहेत. गुलवाडे राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या विजयाची शक्यता किती आहे, हे मतदानानंतर स्पष्ट होईल.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही राज्यातील डॉक्टरांचे विविध प्रश्न, तक्रारी आणि हक्कांसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेणारी संस्था आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी 17 जानेवारी 2025 रोजी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले. नामांकन अर्जांची छाननी 27 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली. अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना 3 मार्च 2025 पर्यंत संधी देण्यात आली होती. यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार 3 एप्रिल सकाळी 8 वाजता सुरू होणारे हे मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे.

Chandrashekhar Bawankule : वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेल्या जमिनी परत मिळणार

राज्यभर मतदान केंद्रे

राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेला पारदर्शकता यावी यासाठी स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रभर कार्यरत डॉक्टर आपल्या मतांचा हक्क बजावणार असून, यातून वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष देणारे आणि डॉक्टरांच्या हिताचे निर्णय घेणारे प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) ही राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचे नियमन करणारी संस्था आहे. ही संस्था डॉक्टरांच्या नोंदणीपासून ते वैद्यकीय नैतिकतेचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवते. तसेच, वैद्यकीय तक्रारींची सोडवणूक, वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जासंदर्भातील सुधारणा आणि डॉक्टरांसाठी वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी MMC वर असते. त्यामुळे या निवडणुकीला वैद्यकीय क्षेत्रात मोठे महत्त्व आहे.

Navneet Rana : पश्चिम विदर्भाच्या दळणवळणाला अमरावती डिव्हिजनची प्रतिक्षा

निवडणुकीबाबत डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सुकता व्यक्त केली जात आहे. अनेक डॉक्टरांचे संघटन प्रमुख यामध्ये आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी सरसावले आहेत. या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही डॉक्टरांसाठी महत्त्वाची संस्था असल्याने प्रत्येक डॉक्टराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. राज्यभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ञ या निवडणुकीच्या निकालाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!