महाराष्ट्र

पर्यावरणीय बदलाची मुहूर्तमेढ Chandrapur मधून होणार

‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’बाबत Sudhir Mungantiwar आशावादी

Author

संपूर्ण जगाला पर्यावरणाचा अमूल्य संदेश देणारे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातून पर्यावरण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.

राज्याला हिरवळीचा महाराष्ट्र अशी ओळख मिळवून दिली ती माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. मुनगंटीवार यांच्या वनमंत्री पदाच्या कार्यकाळात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविली गेली. या मोहिमेची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. आता त्याच मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातून पर्यावरण बदलाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. चंद्रपूर येथे तीन दिवसांची परिषद होणार आहे. या परिषदेतून पुढील तीन दशकांची अर्थात 30 वर्षांच्या पर्यावरणाची बिजं रोवली गेली पाहिजे. ‘क्लायमॅट चेंज’ ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी झाली पाहिजे, असं ठाम प्रतिपादन राज्याचे माजी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

जग प्रसिद्धी वाघांचा जिल्हा असलेल्या चंद्रपुरात पर्यावरण जागृतीसाठी जागतिकस्तरावरील परिषद होत आहे. अशी परिषद चंद्रपुरात होत असल्याचा नक्कीच अभिमान आहे. मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठ यांनी अमेरिकेच्या सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्या शैक्षणिक सहकार्याने या परिषदेचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, पुण्याची इकोलॉजिकल सोसायटी,आणि चंद्रपूर वन अकादमी यांचे सहकार्य यासाठी लाभणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

विद्यमान वनमंत्र्यांकडून Sudhir Mungantiwar यांचं तोंडभरून कौतुक

इतिहासाची Forest Academy मध्ये नोंद

जागतिक पर्यावरण बदलावर होणाऱ्या या ऐतिहासिक परिषदेची चंद्रपूर वन अकादमी साक्षीदार होणार आहे. 16 जानेवारीपासून तीन दिवस ही परिषद चंद्रपुरात चालणार आहे. चंद्रपुरात एसएनडीटी विद्यापीठाचं केंद्र आणण्यात मुनगंटीवार यांना सिंहाचा वाटा आहे. आता त्याच विद्यापीठाकडून चंद्रपुरात जागतिक परिषद होत असल्यानं जगभरातील पर्यावरणवादी चांदा नगरीत विचारमंथन करणार आहेत. परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. विशेष पाहुणे म्हणून मुख्य सचिव सुजाता सौनिक राहतील.

जलपुरुष राजेंद्रसिंह, चाणक्य मंडळ प्रमुख अविनाश धर्माधिकारी, सलील कादेर,अमेरिकेतील हवामान तज्ज्ञ डॉ. नील फिलिप, डॉ. परिमिता सेन, डॉ. दुराई स्वामी, डॉ अमित होरडे, डॉ सुधाकर परदेशी, आयआयटी मुंबईच्या हरीप्रिया यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. प्रा. रुबी ओझा, अतिरिक्त मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्यासह अनेक मान्यवर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Conference बद्दल उत्सुकता

चंद्रपूर येथे होत असलेल्या या जागतिक कॉन्फरन्सची उत्सुकता जगभरातील पर्यावरणवाद्यांना आहे. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी विस्तारानं माहिती दिली. एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले, डॉ. मंगेश गुलवाडे, नम्रता ठेमस्कर यावेळी उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, 2050 पर्यंत शेतीचे उत्पादन 30 टक्क्यांनी कमी होणार आहे. तेव्हा परिस्थिती भीषण होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. त्यामुळे या कॉन्फरन्सच्या बिजारोपणातून हजारो लोकांना जोडावे लागणार आहे. त्यासाठी खास मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे.

मानव वन्यजीव संघर्षाबाबत Ganesh Naik यांची मोठी घोषणा

मोबाइलसाठी तयार करण्यात आलेलं हे अॅप लवकरच वापरासाठी उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेला पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या वक्तींनी व स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित राहावे. पर्यावरणासाठी अनेक संघटना, संस्था काम करतात. त्यांना देशस्तरावर एकत्र आणता येईल का, याचाही विचार या तीन दिवसांत होणार आहे. दिल्लीत मार्च-एप्रिलमध्ये परिषद घेण्याचाही विचार आहे. चंद्रपुरातील ‘क्लायमेट चेंज’ची ही चळवळ आधी राज्यव्यापी आणि नंतर देशव्यापी करायची आहे, असं मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

Mega आयोजन

सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात होणारा कोणताही उपक्रम भव्यदिव्य असाच असतो. अगदी तशाच पद्धतीनं पर्यावरण विषयक परिषदेची तयारी देखील सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी पर्यावरण रॅली काढण्यात येणार आहे. गांधी चौकातून ही रॅली निघेल. प्रियदर्शनी सभागृहाजवळ रॅलीचा समारोप होईल. मकरसंक्रांतीनंतर 21 जूनपर्यंत दिवस मोठा होत जातो. अगदी त्याचप्रमाणे ही चळवळही मोठी होत जाणार, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी जैविक शेती, सेंद्रीय शेती यावर जोर द्यावा. त्यांनी यामध्ये कार्य केल्यास प्रदूषणाला तोंड देता येईल. चंद्रपूरमध्ये प्रदूषणाची धोक्याची पातळी कमीजास्त होत असते. येथील उद्योगांमुळे हे होत आहे. विकासासाठी उद्योग आवश्यकच आहेत. पण उद्योग प्रदूषण वाढविणारे नको. उद्योग बंद करता येणार नाहिी. त्यावर लाखो लोकांची उपजिविका आहे. त्यामुळं उद्योग आणि प्रदूषण याचे संतुलन साधावं लागेल, असेही मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!