महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : एकदाचं ठरवा, काहीतरी घडवा

Thackeray Brothers : शिवतीर्थवर - मातोश्रीवर भेटी, पण सत्तेचा डाव कधी?

Post View : 1

Author

राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात गदारोळ माजला आहे. त्यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीने हा घमासान आणखी तीव्र केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात सध्या ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचे ढग दाटून आले आहेत. बुधवारी (10 सप्टेंबर रोजी) सकाळी, कोणालाही कानोसा न लागू देता, उद्धव ठाकरे यांनी दादर येथील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी हजेरी लावली. ही भेट इतकी गुप्त होती की, जणू कुणालाही काही माहिती पडू द्यायची नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे खंदे समर्थक संजय राऊत आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते. तर मनसेच्या बाजूने संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. गेल्या पाऊण तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये कसली तरी खलबतं सुरू होती. पण त्याचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

ठाकरे बंधूंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्याचा सूर उमटला असून, ठाकरे बंधूंची ही जवळीक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय रंग आणणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी गणेशोत्सवातही ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या घरी भेटी देऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. उद्धव ठाकरे यांनी प्रथमच शिवतीर्थवर पाऊल ठेवले, तेव्हा त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेही होते. त्या भेटीत दोन्ही कुटुंबांनी एकत्र जेवणाचा आनंद लुटला. जणू काही जुने सख्खे भाऊ पुन्हा एकत्र येत असल्याचा संदेश देत होते.

Mahayuti : अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा अन् आत्महत्या

महापालिका निवडणुकीचे संकेत

आधी, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनी मातोश्रीवर जाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या भेटींवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, भाजपचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या खास शैलीत टोमणा मारला आहे. ‘एकदाचं काहीतरी ठरवा. दोघेही एकत्र येण्यास कुणालाही आक्षेप नाही. पण या भेटींमुळे अफवा तर पसरतात, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. मुनगंटीवार, जे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात, यांनी पुढे सांगितले, महापालिका निवडणूक तरी एकत्र लढा, म्हणजे किमान काही तरी ठोस दिसेल.

मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरणात हास्याची लकेर तर उमटली, पण त्याचवेळी ठाकरे बंधूंच्या भेटीमागील खरे हेतू काय, याबाबत प्रश्नचिन्हही उभे राहिले. मुनगंटीवार यांचे हे वक्तव्य केवळ टोमणा नाही, तर त्यातून त्यांनी ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळकीला एकप्रकारे आव्हानच दिले  आहे. त्यांच्या मते, जर ठाकरे बंधू खरंच एकत्र येण्याचा विचार करत असतील, तर त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका जाहीर करावी. ठाकरे बंधूंच्या या सातत्यपूर्ण भेटींमुळे एक गोष्ट स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मोठं घडण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती ही केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून, येत्या विधानसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटू शकतात.

Sunil Mendhe : सी.पी. राधाकृष्णन यांचे नेतृत्व घडवणार प्रगत भारत

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही जवळीक खरंच राजकीय युतीत रूपांतरित होईल का, की हा केवळ कौटुंबिक सलोख्याचा प्रयत्न आहे? याचं उत्तर कदाचित येत्या काही दिवसांत मिळेल.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!