महाराष्ट्र

Amravati : शहर सौंदर्याच्या शोधात, खानाबदोष परतीच्या वाटेवर

Sulbha Khodke : अमरावतीच्या इतिहासात नव्या पानांची तयारी

Author

अमरावती शहर जिथे एकीकडे ऐतिहासिक शाळांचा शताब्दी सोहळा साजरा होत आहे, तिथेच भटक्या लोकांचे अतिक्रमण शहराच्या सौंदर्यावर काळी छाया टाकत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुलभा खोडके यांनी ठोस पावले उचलत, खानाबदोशांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

शहराच्या सौंदर्यीकरणासाठी यंत्रणा झटत असतानाच, अमरावतीच्या मध्यवर्ती भागांमध्ये आणि ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात खानाबदोश आणि भटक्या लोकांचे वाढते अतिक्रमण प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. विशेषतः न्यू हायस्कूल, न्यू गर्ल्स हायस्कूल आणि इतर महत्त्वाच्या शैक्षणिक इमारतींच्या परिसरात या लोकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सुरक्षेचे प्रश्न उभे राहत आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार सुलभा खोडके यांनी पुढाकार घेत मनपा व पोलीस प्रशासनाला तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष बाब म्हणजे न्यू हायस्कूल आणि न्यू गर्ल्स स्कूल या दोन्ही शाळा यंदा आपला शताब्दी महोत्सव साजरा करत आहेत. विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांमुळे शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक व पाहुण्यांची उपस्थिती असते. मात्र या परिसरात खानाबदोशांनी ठाण मांडल्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा गडबडीत सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.

अतिक्रमणाचा कहर

आधीही प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवली होती, पण अतिक्रमण पुन्हा नव्याने वाढले आहे. या अतिक्रमणामुळे केवळ सौंदर्यहानीच होत नाही, तर नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना देखील वाढत आहे. शाळांजवळ असलेल्या सार्वजनिक रस्त्यांवर भटक्या व्यक्तींचे गट बसून राहिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे कठीण झाले आहे. शाळेच्या गेटसमोरच घाण साचल्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत.

Bhandara : नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचा सहकारी विजय

या संदर्भात आमदार सुलभा खोडके यांनी स्वतः त्या भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी उपस्थित खानाबदोशांशी थेट संवाद साधत त्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी मनपा आणि पोलीस प्रशासनाला या व्यक्तींना तात्काळ त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.

सहकार्याची गरज

अमरावती शहर ऐतिहासिक वारशाने समृद्ध असून, आज ते आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र या वाटचालीत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अतिक्रमणासारख्या समस्या रोखण्यासाठी केवळ प्रशासनच नव्हे, तर नागरिकांनीही सजग राहून सहभाग आवश्यक आहे.

Amravati : आमदारांची वीजयंत्रणेला ‘रेडी फॉर रेन्स’ कमांड

आमदार खोडके यांच्या या पुढाकारामुळे शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शहरातील सौंदर्य आणि स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन लवकरच ठोस पावले उचलेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील शंभर वर्षांची शैक्षणिक परंपरा आणि आधुनिकतेची घडी या दोन्ही गोष्टी सांभाळण्यासाठी आता अतिक्रमणाच्या विघ्नांवर निर्णायक उपाययोजना गरजेच्या आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!