महाराष्ट्र

Bhandara : महसूल विभागात भ्रष्टाचाराचा भांडाफोड

Vidarbha : भंडाऱ्यात लाचखोरीला आळा

Author

भंडारा जिल्ह्यात महसूल विभागातील सहाय्यक अधिकाऱ्याला 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीपणे पार पाडली.

भंडारा जिल्ह्यात भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालणारी सापळा कारवाई करण्यात आली. महसूल विभागातील एका सहाय्यक अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. डॉ. दिगंबर प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अत्यंत योजनाबद्धपणे केली. आरोपी अधिकारी सुनील होमराज लोहारे याने तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच उपविभागीय कार्यालयात स्वतःच्या खुर्चीत बसून स्वीकारली.

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या केसलवाडा येथील जमिनीचा सातबारा दुरुस्ती अर्ज प्रलंबित असतानाच, त्यावर कार्यवाही करण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली होती. ही रक्कम आज दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी दुपारी त्याने स्वीकारली आणि त्याच क्षणी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. लोहारेला पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया यांच्या पथकाने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासामागे मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा

कारवाईला वेग 

संपूर्ण कारवाईमागे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांचे नियोजन, मार्गदर्शन आणि भ्रष्टाचारविरोधी धोरणाचे दृढ नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांच्या दूरदृष्टीने पोलीस यंत्रणेला केवळ अंमलबजावणीच नव्हे, तर नैतिक बळ देखील प्राप्त झाले. डॉ. प्रधान यांच्या मार्गदर्शनात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रात सातत्याने यशस्वी कारवाया घडवत आहे.

अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम आणि संजय पुरंदरे यांनी सापळ्याच्या नियोजनात तांत्रिक बारकावे आणि तपशिलांवर लक्ष देत संपूर्ण कारवाई अचूकतेने पार पाडली. भंडारा येथील पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया यांच्या नेतृत्वाखालील टीमने अखेरच्या क्षणापर्यंत गुप्तता राखत कारवाईत शिस्तबद्ध सहभाग घेतला. पथकातील मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, विष्णू वरठी आणि नरेंद्र लाखडे यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.

Harshwardhan Sapkal : भाजप आणि संघ संविधान बदलू पाहत आहेत

लोकसेवकाचे चारित्र्य उजेडात

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने असलेल्या जमिनीचा सातबारा चुकीने अन्य व्यक्तीच्या नावे चढविला गेला होता. या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदाराने फेब्रुवारीमध्ये अर्ज केला होता. मात्र, त्यावर पुढे कार्यवाही करण्याऐवजी सुनील लोहारे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली. 11 एप्रिल रोजी पडताळणी दरम्यान त्याने पंचा समोरही लाचेची मागणी केली होती. त्यामुळे 15 एप्रिल रोजी कारवाई करत त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनात या कारवाईने भीती निर्माण केली आहे. सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी पोलिस यंत्रणा सजग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आरोपी लोहारे यांच्याकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपासात त्याच्या आर्थिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्याची शक्यता आहे. घरझडती सुरू असून इतरही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात येत आहेत.

 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!