महाराष्ट्र

Sunil Mendhe : अवकाळी पावसात घुटमळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढाकार

Gondia : कृतज्ञतेचा संदर्भ देत माजी खासदारांचा आग्रह

Post View : 93

Author

पूर्व विदर्भातील दोन जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दखल घेण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. मात्र त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट समोर आले आहे. गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील अनेक भागांत, विशेषतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात, 5 ते 7 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे 42 ते 45 अंश सेल्सिअसच्या तापमानात दमणूक झालेल्या विदर्भात थोडा गारवा निर्माण झाला.

पूर्व विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. पण अवकाळी पावसाच्या अनपेक्षित हजेरीने त्यांच्या कष्टांची माती केली आहे. यामुळे त्यांना या संकटाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. धान, गहू, हरभरा, भाजी आणि फळ पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर, भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

Parinay Fuke : गोंदियाच्या विकासात नव्या प्रकाशाची भर

तातडीने सर्वेक्षण करा

माजी खासदार सुनील मेंढे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केले आहे की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण केले जावे. त्यांनी राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून पंचनामे करून आर्थिक मदतीची घोषणा करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी सुद्धा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने केली होती. शेतकऱ्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. मेंढे यांनी म्हटले आहे की, सद्याच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक दबाव आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात वारंवार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या गारपीटीमुळे शेतातील धान, गहू, हरभरा, भाजी आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य एक मोठे प्रश्न बनले आहे. पिकांना जपले तरी या संकटामुळे त्यांच्या हातात काय उरेल? अशा स्थितीत, शासनाने अविलंब सर्वेक्षण करून मदतीची घोषणा केली पाहिजे. शेतकऱ्यांना ही मदत दिलासा देणारी ठरेल, असे सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी राज्य सरकारकडून अपील केले आहे की, संबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून पंचनामे करून त्याची आकडेवारी जाहीर केली जावी. त्यासाठी लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पीक नष्ट होताना पाहणे आणि त्यांना शासनाच्या मदतीची आवश्यकता असताना, हा मदतीचा हात त्यांना मोठा दिलासा देईल, अशी अपेक्षा माजी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे.

Operation Sindoor : शिवसेनेच्या जयघोषांनी झळकलं अकोल्यात देशभक्तीचं रूप 

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!