पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपुरच्या सुनीता जमगडे संदर्भात धर्माशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. धर्माच्या आडून सुरु झालेला हा प्रवास आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात धक्का बसला होता. त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवून पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिले होते. मात्र या गंभीर राजकीय व लष्करी परिस्थितीत महाराष्ट्रातील नागपुरची 43 वर्षीय सुनीता जमगडे या महिलेंचा पाकिस्तानात प्रवेश करणे अनेकांना धक्कादायक ठरले आहे. एलओसी ओलांडून तिने थेट पाकिस्तानात प्रवेश केल्याचा प्रकार समोर आला असून तिला लवकरच भारतात परत आणले गेले आहे. सध्या तिच्याविरुद्ध तपास सुरू आहे.
सुनीता जमगडेने पाकिस्तानात जाण्यासाठी प्रथम दोन वेळा अटारी बॉर्डर ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. या प्रयत्नांच्या दरम्यान तिला एक पाकिस्तानी ख्रिश्चन धर्मगुरूने सल्ला दिला होता की एलओसी मार्गेच पाकिस्तानात जावे, असा आश्चर्यकारक खुलासा सुनीताने केला आहे. या धर्मगुरूची ओळख मात्र अद्याप तपासली जात आहे. कारण तो तिला भारतातील एका धार्मिक व्हाट्सअप ग्रुपवर भेटला होता. त्यामुळे हा प्रश्न उभा राहतो की, अशा धार्मिक गटांमध्ये पाकिस्तानातून अशी कोणती भूमिका असू शकते? तपास यंत्रणा याचा छाननी करत आहे.
झुल्फिकारचं गूढ कायम
सुनीता जमगडेच्या या धक्कादायक प्रवासामुळे नागपुरातील पोलीस आणि केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. सुनीता जमगडेने14 मे रोजी कारगिल परिसरातून नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. तिथून तिच्या मुलाला बालकल्याण समितीच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. जो नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यावर नागपुरात परत आणण्यात आला आहे. मात्र सुनीता पाकिस्तानात कोणत्या व्यक्तीची भेट घेण्यासाठी गेली होती, याबाबत ती पोलिसांना स्पष्ट माहिती देत नाहीये आणि उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे.
सुनीताला कारगिलजवळून एलओसी ओलांडताच पाकिस्तानी रेजर्सनी ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली. दोन दिवसांनी तिला भारतीय सीमा सुरक्षा दलाकडे सुपूर्द करण्यात आले. आता ती नागपुर पोलीस ताब्यात आहे. सुनीता जमगडेने भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्याचा दावा करणारा ‘जुल्फिकार’ हा व्यक्ती खरंच आहे की काही बनावट सोशल मीडिया अकाउंट, हे भारतीय तपास यंत्रणांसाठी मोठा प्रश्न बनला आहे. या प्रकरणात तपास वेगाने सुरू आहे. नवीन उलगडणी शक्य आहेत. दरम्यान, तिला विशेष न्यायालयात 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, जी संपत आहे.
पुढील कारवाईसाठी तिला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुनीता जमगडेच्या पाकिस्तान प्रवासाचा या राजकीय व सुरक्षा पार्श्वभूमीवर मोठा अर्थ लावला जात आहे. या प्रकरणातून नियंत्रण रेषेवरील सुरक्षा आणि माहिती यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच, धार्मिक गटांमधील आंतरराष्ट्रीय गुंतागुंत आणि त्याचा सुरक्षेशी कसा संबंध आहे, याबाबतही गहन तपास सुरू आहे.