
मस्साजोग येथील सरपंचाच्या खुनाचे प्रकरण अजुनही तापलेलेच. याघटनेबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी काही खुलासे केले आहेत.
वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे गेल्या 5 वर्षात बिघडले आहेत. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे नाव असल्याने मी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय घेतला नव्हता. वाल्मिक कराड आणि माझे संबंध फारसे तुटले नव्हते. ही घटना त्याला रोखता आली असती. वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. त्यामुळे कराड म्हणेल तेच धनंजय मुंडे ऐकायचे. धनंजय मुंडे यांचा पाठिंबा होता म्हणुनच कराडने हे केले, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
सुरेश धस म्हणाले की, मी खंडणीत धनंजय मुंडेंचं नाव घेतो, खूनाच्या प्रकरणात नाही. 28 मे 2024 नंतर 14 जून, 19 जूनला अवादा कंपनीतील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. परंतु माझा जबाब कुणी नोंदविला नाही. या प्रकरणात ज्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, तो सहआरोपी झाला पाहिजे. वाल्मिक कराड फोन उचलून डायरेक्ट तोडण्याची आणि मारण्याची भाषा वापरतात. त्यामुळे कराडचा फोन झाला असेल, हे आपल्याला माहित असल्याचेही सुरेश धस यांनी सांगितले. आज या सर्व बाबी समोर आल्या आहेत. मला जर एसआयटीची नोटीस आली तर मी चौकशीला जाईन, असेही धस म्हणाले.

झाला होता वाद
अवादा कंपनीने मस्साजोग येथील 30 एकर जमीन भाड्याने घेतली होती. गावातील काही पोरांना संतोष देशमुख याने मारहाण केली होती. अवादा कंपनीतील सुरक्षारक्षक मस्साजोग गावाचे होते. त्यांना खंडणीसाठी आलेल्या गुंडांनी मारले तेव्हा संतोष देशमुख यांना सरपंच म्हणून बोलावले होते. त्यावेळी 6 डिसेंबर रोजी तिथे मोठा वाद झाला होता, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे.
Danger हत्या
धस पुढे म्हणाले, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, आंधळे, विष्णू चाटे ही लोकं वाल्मिक कराडचे सोबती आहेत. त्यामुळे कराड यांच्या परवानगीशिवाय संतोष देशमुख यांना मारले जाणार नाही, हे मला कळले. मस्साजोगमधील वस्तुस्थिती मी ऐकली आहे. संतोष देशमुख यांचा पोस्टमोर्टम रिपोर्ट वाचला. अतिशय निघृण पद्धतीने त्यांचा खून झाला आहे. हे प्रकरण जातीवादाचा विषय नसून अतिशय अमानवीय पद्धतीने झालेल्या खुनाचा विषय आहे, असे सुरेश धस म्हणाले.
पोस्टमोर्टम करणाऱ्या सिव्हिल सर्जन यांनी त्याची परिस्थिती सांगितली. इतका क्रूर मृत्यू असूच शकत नाही, असे डॉक्टरांकडून मला माहिती झाले. विधानसभेत या घटनेची संपूर्ण माहिती मांडली होती. त्यावेळी पोलिस तपास सुरू झालेला नव्हता. या मारहाणीचे व्हिडीओ मी स्वतः सभागृहात चित्रिकरण केले असल्याच धस म्हणाले. संतोष देशमुख याला ज्या पद्धतीने मारलं ते पाहता आरोपी सराईत असून त्यांना ड्रग्स दिले असावे त्यातून त्यांनी क्रूरपणे मारलेले आहे.