महाराष्ट्र

NCP : राजकारणाचे नवे घर, जुने चेहरे

Maharashtra : माजी आमदारांचे राष्ट्रवादीत दमदार आगमन

Author

सांगली जिल्ह्यातील तीन माजी आमदारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवीन हालचाली सुरू झाल्या आहेत.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या उलथापालथीची नांदी सुरू झाली आहे. तीन माजी आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करून खळबळ उडवली आहे. विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख आणि शिवाजीराव नाईक या तीन नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय नकाशात मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागलेली असतानाच हा प्रवेश अधिकच गाजतो आहे.

राजकारणातील घडामोडीमुळे सांगलीतील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. अजित पवार यांच्या गटाला यातून तातडीचा राजकीय फायदा होईल, असा सूर उमटू लागला आहे. भाजपमधील अंतर्गत असंतोष, उमेदवारीच्या राजकारणातील गोंधळ आणि स्थानिक स्तरावरील मनोमिलनाचा अभाव या साऱ्यामुळे हे बदल घडून आले आहेत.

Bhandara : मंडोवीच्या वाळूतून उघड झालं तस्करीचं काळं सोनं 

जगतापांचा भाजपला झटका

विलासराव जगताप यांनी 2014 मध्ये भाजपकडून आमदारकी मिळवली होती. त्यानंतर 2019 मध्येही भाजपच्याच तिकीटावर लढले, पण त्यांचा पराभव झाला. तरीही ते पक्षासाठी सक्रिय राहिले होते. मात्र 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरून पक्षात फूट पडली. त्यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला विरोध करून अपक्ष उमेदवाराच्या बाजूने भूमिका घेतली. हीच गोष्ट विधानसभेला देखील घडली.

विलासराव जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभं राहत पक्षशिस्त झुगारली. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र जगताप यांनी त्याला आव्हान देत, मी आधीच राजीनामा दिला आहे, असं स्पष्ट केलं. या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपला जोरदार झटका दिला.

Parinay Fuke : विकासाच्या प्रवाहात गोवारी समाजाची एन्ट्री

नाईकांचा अनुभव पारड्यात

शिवाजीराव नाईक हे 1995 पासून राजकीय प्रवासात आहेत. अपक्ष म्हणून निवडून येऊन त्यांनी युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलं. 2014 आणि 2019 मध्ये ते भाजपकडून निवडणूक लढले. मात्र 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. काही काळ राष्ट्रवादी (शरद पवार) गटात राहून त्यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

शिवाजीराव नाईक यांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला काहीसा धक्का बसल्याचे मानले जाते, पण नाईक यांच्या पक्ष बदलाचा फारसा परिणाम जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर होईल, असे चित्र नाही. शिराळा मतदारसंघात अजूनही सत्यजित देशमुख यांचे वर्चस्व असल्यामुळे नाईक यांचा पुनरागमन फारसा प्रभावी ठरणार नाही, असे राजकीय वर्तुळाचे मत आहे.

Pahalgam Attack : काँग्रेसची धोरणं ‘सर तन से जुदा’ वाली

देशमुखांची उमेदवारीसाठी भटकंती

राजेंद्र देशमुख हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. नंतर भाजपमध्ये गेले. 2024 मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे मोर्चा वळवला, पण तिथेही निराशा पदरी पडली. त्यामुळे त्यांनी अपक्ष लढत दिली. या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. देशमुख यांचा राजकीय प्रवास संमिश्र राहिला आहे. त्यांनी पक्षांची सातत्याने अदलाबदल केली आहे. मात्र त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असल्यामुळे तेथे त्यांची पकड कमी झाली आहे.

तीनही माजी आमदारांनी भाजप सोडल्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण याच पाटील यांनी यापूर्वी देशमुख, जगताप, नाईक यांच्यासह अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणले होते. त्यामुळे हे नेते बाहेर पडल्याने त्यांच्यावर नेतृत्वाच्या आघाडीवरून आरोप होऊ लागले आहेत. भाजपकडे सध्या अद्याप मजबूत आमदार आणि कार्यकर्ते आहेत. पण येणाऱ्या स्थानिक निवडणुकीमध्ये हे घडामोडी कोणत्या पद्धतीने परिणाम करतील, याकडे सर्वांचे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!