महाराष्ट्र

Amravati : नागपूर, गोंदियानंतर आता अमरावतीतही थांबतील सिग्नल

Heat Wave : वाढत्या उष्णतेपासून वाचण्यासाठी उपाययोजना

Post View : 32

Author

तापत्या उन्हाच्या कहराने हैराण झालेल्या अमरावतीकर वाहनचालकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे शहरातील ट्रॅफिक सिग्नल दुपारी काही तासांसाठी बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असताना, रस्त्यांवर उभे राहणाऱ्या वाहनचालकांची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जात आहे. वाढत्या उष्णतेचा विचार करता, शहरातील यातायात पोलिस विभागाने मनपा आयुक्तांकडे एक आगळावेगळं आणि संवेदनशील पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. दुपारी 1 ते 5 या कालावधीत शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल तात्पुरते बंद ठेवावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र महापालिकेकडे पाठवले आहे. या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, तीव्र उन्हाच्या झळांमध्ये ट्रॅफिक सिग्नलवर उभं राहणाऱ्या वाहनचालकांना ‘लू’ सारख्या गंभीर त्रासांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा तात्पुरत्या उपाययोजनांची आवश्यकता आहे.

Harshawardhan Sapkal : हल्लेखोरांवर अंतिम प्रहाराची मागणी

वाहतूक नियंत्रण

पत्रात विशेषतः अमरावतीतील राजकमल चौक, पंचवटी चौक, इरविन चौक, शेगाव नाका, गर्ल्स हायस्कूल चौक आणि शिव टेकडी चौक यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या चौरस्त्यांवर कोणतीही सावली वा ग्रीन नेटची व्यवस्था उपलब्ध नसल्याने, थांबलेल्या वाहनचालकांना उन्हाच्या झळांचा थेट सामना करावा लागतो. अशा वेळी सिग्नल बंद ठेवून वाहतूक मॅन्युअली नियंत्रित करणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरू शकते.

जिल्ह्यातील वाहतूक विभागाचा हा निर्णय नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आलेला आहे. आता सर्वांचे लक्ष महापालिका आयुक्त यांच्या उत्तराकडे लागले आहे. त्यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यास, शहरात नवीन प्रकारची वाहतूक पद्धती अमलात आणली जाईल.

Prakash Ambedkar : शरद पवारांचं विसरलेलं पत्र बनलं चर्चेचा केंद्रबिंदू

नागपूर आणि गोंदिया शहरांमध्येही उष्णतेच्या तीव्रतेमुळे अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथील यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर आता अमरावती शहरही या पावलावर पाऊल टाकत आहे. ही बाब अमरावतीसाठी एक नवा दृष्टीकोन आणि जबाबदार शहरी प्रशासनाचे लक्षण म्हणता येईल. उन्हाळ्यातील या ‘थांबलेल्या सिग्नल्स’ची ही कहाणी, केवळ सिग्नलची विश्रांती नाही, तर वाहनचालकांच्या जीविताची सुरक्षितता जपण्याचा निर्धार आहे.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!