महाराष्ट्र

Jayant Patil : लायसन्स घ्या अन् वाट्टेल ते करा

Sand Mafia : तुमसर तालुक्याच्या आमदारांचे पत्र अधिवेशनात

Share:

Author

तुमसर तालुक्यातील आमदार राजू कोरेमरे यांनी तहसीलदारांना दिलेलं पत्र अधिवेशनात पोहोचलं आहे. जयंत पाटील यांनी या पत्रावरून विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. वाळू माफियांविरोधात सत्ताधारी आमदार कसे तडफडत आहेत, हे पाटील यांनी दाखवून दिलं. 

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सध्या वाळू माफियांचं राज्य आहे. मोहाडी तालुक्यातील रेती घाटांवर एक वेगळीच रंगत आहे. कायद्याच्या नावाने बोंब आहे. वाळू माफिया आणि गुंड नियम धाब्यावर बसवित आहेत. वाळू उपसण्यासाठीचे सरकारी नियम, महसूल विभाग, खनिज अधिकारी हे सगळे नावापुरते आहेत, कारण खरा मालक कोणीतरी वेगळाच आहे. आमदार कारेमोरे यांच्या पत्राचा आधार घेत जयंत पाटील यांनी ही बाबत सभागृहात मांडली.

बाप मोठा की भाऊ? सगळं काही आम्हीच खाऊ, हा मंत्र जणू वाळू माफियांनी उराशी बाळगल्याची टीकाही पाटील यांनी केली. महसूल विभाग, खनिज विभाग, पोलिस यांच्याबद्दलही कारेमोरे यांनी टीका केल्याबद्दल जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केलं. रेतीच्या सोन्याची लूट सुरू आहे. कोतवालापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि पोलीस शिपायांपासून गृहमंत्र्यांपर्यंत, प्रत्येकाला आपली ‘लक्ष्मी’ मिळत असल्याची टीका स्वत: कारेमोरे यांनी केल्यानं विरोधकांना सरकारला कोंडीत पकडण्याचा मुद्दा मिळाला आहे. 

Sudhir Mumgantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा रौद्रवतार

राजकारण की गुंडगिरी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना तुमसर तालुक्याचे आमदार राजू कोरमारे यांचे पत्र शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात दाखविले. त्यानंतर तर खळबळ उडाली. वाळू माफिया प्रशासनासोबत संगनमत करीत असल्याची टीकाच सुरू झाली. या मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी सरकारला सुनावलं. लायसन्स घ्या आणि तालुक्यात वाट्टेल तसे निर्णय घ्या, हीच पद्धत आता उरली आहे. सरकार खरंच काही करणार आहे का, असा प्रश्नही पाटील यांनी केला.

वाळू माफियांपुढं कायदा आणि अधिकारी हतबल आहेत. निवडणुकीपूर्वी ही परिस्थिती आणखी गंभीर होती. आता अतिगंभीर झाली आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या जीवावर हे अवैध व्यवसाय सुरू आहेत. गुंड लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार करीत आहेत. अशात जयंत पाटील यांनी महायुतीचेच पाय सरकारच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!