महाराष्ट्र

Uday Samant : ठाकरेंचं एकत्र येणं म्हणजे उपरोधाचं राजकारण

Maharashtra : युतीच्या गोंधळात सामंतांचं रोखठोक विधान

Post View : 54

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज-उद्धव ठाकरे युतीची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रावून टाकणारी स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेने वातावरण तापवलं आहे. एका बाजूला शिवसेनेतून फुटलेले आणि सत्तेचा भाग बनलेले शिंदे गट मात्र या चर्चांनी अस्वस्थ होत असल्याचं चित्र दिसत आहे.

उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील प्रमुख नेता उदय सामंत यांनी अत्यंत ठाम, उपरोधिक आणि सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात नवा चर्चा-पर्व सुरू झाला आहे. सामंत यांनी स्पष्ट केलं की, राज ठाकरे यांचं नेतृत्व ठाम भूमिकांवर उभं आहे. त्यांनी अटी-शर्थी स्वीकारत युती करेल, हे अशक्यप्राय आहे. अशा प्रकारच्या युतीच्या शक्यतेलाच त्यांनी विनोदी आणि उपरोधिक भाषेत छेद दिला आहे.

Gondia : उन्हाचा चटका इतका प्रचंड की, सिग्नलही झालं बंद

शाळकरी मुलांशी तुलना

उदय सामंत यांनी म्हटलं की, राज ठाकरे हे शाळकरी मुलांसारखे कोणत्याही अटींवर तडजोड करतील, असं त्यांना वाटत नाही. या विधानामुळे नुसता राजकीय संदेश दिला नाही, तर त्या विधानामागे उपरोधाची धार स्पष्ट दिसून आली. त्यांनी पूर्वी केलेली ‘हा काही खेळ आहे का?’ ही टिपणी आता पुन्हा जिवंत झाली आहे.

सामंतांनी ठाकरेंच्या युतीतील अटींचाही उल्लेख केला. फडणवीसांशी संवाद नको, शिंदेंपासून अंतर हवं, दिल्लीतल्या नेत्यांशी संबंध नको, या सगळ्या अटी युतीसाठी असह्य असल्याचं त्यांनी सूचित केलं. यावर भाष्य करताना त्यांनी हा प्रकार म्हणजे काय क्रीडा महोत्सव आहे का? असं म्हणत या संपूर्ण संभाव्य युतीला उपहासाने झोडपलं.

Amol Mitkari : पवारांची एकता म्हणजे राष्ट्रवादीसाठी नवी पहाट

स्वभावाचं विश्लेषण

सामंत यांनी स्पष्ट केलं की, राज ठाकरे यांचा स्वभाव अत्यंत ठाम असून, ते कुणासमोरही झुकून युती करणे हे त्यांच्या राजकीय चरित्रात बसणारे नाही. साहित्य संमेलनातील भेट म्हणजे एका सुसंस्कृत परंपरेचा भाग होता, हेही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या भूमिकेने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर राजकीय शंका वाढवल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनीही या चर्चेपासून स्वतःला दूर ठेवत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. मात्र, सामंतांच्या भूमिकेमुळे शिंदे गटातील अंतर्गत मतप्रवाह अधिक स्पष्ट होताना दिसत आहे.

सामंत यांनी शिंदे गटाने स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या संधीचंही कौतुक केलं. त्यांनी स्पष्ट केलं की, नव्या नेतृत्वाला संधी देणं हेच राजकारणाचं भविष्य आहे. अशा युतींमुळे गोंधळ निर्माण होतो, हे सूचित करत त्यांनी नव्या युगाचं संकेत दिलं. प्रत्येक क्षणी बदलणारी समीकरणं, प्रत्येक दिवसाला नवा राजकीय ट्रॅक देत आहेत. अशा काळात सामंतांचं ठामपण राजकीय नाट्यात वेगळा सूर निर्माण करत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!