केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा व्यवस्था तातडीने वाढवण्यात आली आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची थेट भाष्य करण्याची सवय आणि वास्तव बोलण्याचा त्यांचा खास अंदाज नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. राजकीय मसलतींपेक्षा त्यांचे विचार खूप खोल आणि कार्यकर्त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे असतात. त्यांचे थेट वक्तव्य अनेकदा वादळी वातावरण तयार करते आणि व्हिडीओच्या माध्यमातून चांगलेच वायरलही होतात. मात्र, आता त्यांच्यावर आलेल्या एका गंभीर धमकीमुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी (3 ऑगस्ट 2025 रोजी) सकाळी 8:46 वाजता पोलिस नियंत्रण कक्षावर एक फोन आला. ज्यात अज्ञात व्यक्तीने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मधील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली.
धक्कादायक फोन नंतर पोलिस प्रशासनात तातडीची धावपळ सुरू झाली. घटनास्थळी श्वान पथकासह अनेक पोलिस अधिकारी धावले आणि घराबाहेर कडक बंदोबस्त तातडीने उभारण्यात आला. गडकरी हे सध्या त्याच नागपुर मधील निवासस्थानी असल्याने सुरक्षा अधिकच गडद करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी तपासासह परिसराची बारकाईने पाहणी सुरू केली आहे. अज्ञात धमकी दिलेल्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एक संशयितही ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.
प्रत्येक हालचालीवर लक्ष
धमकी फोन फेक कॉल असल्याची पोलिसांनी प्राथमिक तपासात नोंद घेतली असली तरीही गडकरींच्या सुरक्षेत कोणतीही घट होऊ नये म्हणून अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.धमकीच्या घटनेनंतर गडकरी यांच्या नागपूर मधील आणि इतर निवासस्थानांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या घरांच्या आजूबाजूला सघन चौकशी सुरू केली आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच, या प्रकरणाने नागपुरात काही काळ राजकीय आणि सामाजिक वातावरणही तणावग्रस्त झाले आहे.
नितीन गडकरी हे सध्याच्या परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी प्रशासन कसे पुढे जाते, हे पुढील काळात पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र तरीही त्यांच्या घरासमोरील बंदोबस्त पाहता, या प्रकारची कोणतीही घातक घटना घडू नये, यासाठी तितक्याच जागरूकतेने पोलिस प्रशासन सज्ज आहे. अशा प्रकारच्या धमक्यांमुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहतो. गडकरी यांच्या बाबतीतही सुरक्षा व्यवस्था अधिक कशी मजबूत करता येईल, यावर प्रशासन काम करत असल्याचे स्पष्ट आहे. नागपुरातील नागरिकांमध्येही या घटनेनंतर सुरक्षा वाढीची मागणी वाढली आहे. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी सगळ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
Devendra Fadnavis : खेळाडूंचा ट्रॅक गोल्डन रनवे बनविण्यास सरकार सज्ज