महाराष्ट्र

Shivani Dani : तरुण नेतृत्वाच्या हाती विदर्भाची औद्योगिक भाग्यरेषा

Vidarbha : अमृतकालमध्ये विदर्भाच्या उद्योगक्रांतीची गती वाढणार

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळाले आहे. शिवानी दाणी वखरे यांची विदर्भाच्या गुंतवणूक सल्लागारपदी नियुक्ती होऊन प्रगतीला गती मिळणार आहे.

विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीला नव्या उंचीवर नेण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत सकारात्मक आणि दृष्टीकोनात्मक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शिवानी दाणी वखरे यांची विदर्भाच्या गुंतवणूक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विदर्भातील औद्योगिक वाटचाल अधिक गतिमान होणार असून स्थानिक नागरिकांना नव्या संधींचा लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘विकसित भारत @अमृतकाल’ हे राष्ट्रीय स्तरावरील दृष्टीपथ लक्षात घेता, या नियोजनामध्ये विदर्भाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. प्रादेशिक गुंतवणुकीस चालना देणे आणि विदर्भाला औद्योगिकदृष्ट्या बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश राहणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र एक आकर्षक केंद्र ठरण्यासाठी आणि विदर्भाच्या औद्योगिक क्षमतेला जागतिक नकाशावर उभारण्यासाठी सरकारने ही ठोस योजना तयार केली आहे.

Lohit Matani : ट्रॅफिकची पाठशाळा अन् शिस्तीच्या शिक्षकांचं ऑपरेशन ‘यु टर्न’

विदर्भात गुंतवणुकीचा प्रवाह

डावोस 2025 या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेपासून विदर्भामध्ये गुंतवणुकीच्या संधींना विशेष चालना मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. येथे असलेली विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, भक्कम अधोसंरचना आणि औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण यामुळे विदर्भ हे औद्योगिक गंतव्यस्थान म्हणून वेगाने पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवानी दाणी वखरे यांच्यासारख्या तरुण, ऊर्जावान आणि दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे. त्यांचे नेतृत्व विदर्भाच्या औद्योगिक नकाशावर ठळक छाप उमटवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

शिवानी दाणी वखरे यांच्याकडे विदर्भातील गुंतवणुकीच्या संधींचा अभ्यास करून त्या देश-विदेशातील गुंतवणूकदारांपुढे प्रभावीपणे मांडण्याची मोठी जबाबदारी असेल. विदर्भातील नैसर्गिक संपत्ती आणि उद्योग क्षेत्रातील अपार क्षमतेचा जागतिक स्तरावर ठसा उमटवण्याचा त्यांचा मुख्य उद्देश असेल. राज्यातील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), मिहान प्रकल्प आणि अन्य औद्योगिक संस्थांमध्ये प्रभावी समन्वय साधणे हे त्यांच्या कामकाजाचे मुख्य अंग राहील. गुंतवणूकदारांना सहज, पारदर्शक आणि अनुकूल व्यावसायिक वातावरण देणे, त्यांचे प्रशासनाशी असलेले सर्व अडथळे दूर करणे आणि त्यांच्या गरजांना तात्काळ प्रतिसाद देणे या गोष्टींवर त्यांचा विशेष भर राहणार आहे.

Ravindra Chavan : महायुतीच्या बळावर स्वराज्य संस्थांमध्ये विजयाचा जल्लोष

आर्थिक प्रगतीचा अध्याय

गुंतवणुकीला चालना मिळाल्यास विदर्भातील बेरोजगार तरुणांसाठी हजारो रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विविध औद्योगिक प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, आयटी हब आणि स्टार्टअप्स यामुळे स्थानिक युवकांना कौशल्य विकासाच्या आणि रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. औद्योगिक वाढीबरोबरच स्थानिक व्यापारी, सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि लघुउद्योगांनाही नव्या संधी मिळणार आहेत. विदर्भाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊन स्थानिक पातळीवर आर्थिक गतीशीलता वाढेल. महसुलात मोठी वाढ होईल. नागपूरसह विदर्भातील प्रमुख शहरे औद्योगिकदृष्ट्या विकसित होतील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!