महाराष्ट्र

Vijay Wadettiwar बळीराजाच्या प्रश्नांवरून विधिमंडळात गदारोळ

Maharashtra : इम्पोर्टेड कापूस शेतकऱ्यांचा गळा घोटतोय

Post View : 32

Author

विधानसभेत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. सरकारच्या शेतकरी धोरणांवर त्यांनी तीव्र टीका करत थेट प्रश्न विचारले.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा टप्पा सध्या आर्थिक राजधानी मुंबईत जोरात सुरू आहे. रोज विविध ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घणाघाती आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कापूस दराच्या घसरणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळात सरकारला चांगलेच धारेवर धरले.

वडेट्टीवार यांनी थेट सरकारलाच सवाल केला, ‘शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणणार आहात की नाही?’ विचारले. त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्लाबोल केला आणि सांगितले की मंत्रीमहोदय या विषयावर मौन बाळगून आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेणे आणि त्यावर ठोस उत्तर देणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार गोलमोल उत्तरं देऊन वेळ मारून नेत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Dr. Parinay Fuke : कोरड्या पडलेल्या घश्यांसाठी विधानपरिषदेत आवाज बुलंद 

सरकारचा दुजाभाव

शेतकऱ्यांना हमीभाव मिळतोय की नाही, यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. आज शेतकऱ्याला 6 हजार 200 6 हजार 300 रुपये दर मिळतोय. हमीभाव कुठे गेला? तो खड्ड्यात का टाकलात? असा सवाल करत, सरकारनेच आधी आश्वासन दिले होते की हे नुकसान भरून दिले जाईल, मग आतापर्यंत का नाही दिले, अशी विचारणा त्यांनी केली.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. जानेवारीपासून आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी सरकारलाच जबाबदार धरत, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलांचे पालकत्व स्विकारण्याची विनंती केली.

वडेट्टीवार संतापले

वडेट्टीवार यांनी सरकारच्या कापूस धोरणावर जोरदार टीका केली. तुम्ही इम्पोर्टेड कापूस आणत आहात, त्यामुळे देशी कापसाचे दर पडत आहेत. हा शेतकऱ्यांच्या गळा घोटण्याचा प्रकार नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. शेतकरी आधीच महागाई, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त आहेत, त्यात सरकारच्या धोरणांमुळे त्यांच्या अडचणी अधिक वाढत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

विधिमंडळात झालेल्या या चर्चेमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकारकडून ठोस उपाययोजना जाहीर होतात का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने त्वरित मदतीचे पाऊल उचलले नाही, तर भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. आता सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!