महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : छत्रपतींच्या अपमानावरून शिवसेनेवर संतापाची लाट 

Sanjay Gaikwad : विवादाच्या वणव्यात झळकली ‘हिंदी सक्ती’

Author

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत तणावाला नव्या वादाने आग दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंबाबत भाजप आमदार संजय गायकवाड यांनी वापरलेल्या शब्दांनी संतप्त प्रतिक्रिया उसळल्या आहेत.

त्रिभाषा सूत्रातून हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर महायुती सरकारमधील तणाव काहीसे शमतोय, तोच एक नवा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात धगधगू लागला आहे. शिवराय, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजीराजेंवरच अपमानास्पद विधान केल्याचा आरोप भाजप आमदार संजय गायकवाड यांच्यावर झाला आहे. या वादाने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत, भाजप आणि शिंदे गटाला थेट माफी मागण्याची मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अश्लाघ्य शब्द वापरून हिंदी भाषेच्या सक्तीसाठी त्यांना मूर्ख म्हणणं, हे अत्यंत लाजिरवाणं आहे. सत्ताधाऱ्यांनी भान ठेवावं की आपण कोणत्या महापुरुषांचा संदर्भ घेतो आणि कोणत्या शब्दात घेतो. असा अपमान करणं ही त्यांच्या संस्कृतीचा भाग झालाय का? या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माफी मागावी

शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी संभाजी महाराज आणि मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. “हे वक्तव्य केवळ महाराजांचा नव्हे, तर समस्त मराठी अस्मितेचा अपमान आहे. शिंदेसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी आणि माफी मागावी,” अशी ठणकावून मागणी त्यांनी केली. लातूरच्या हाडोळती गावात बोलताना संजय गायकवाड म्हणाले, संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? या प्रश्नातूनच गायकवाड यांची जीभ घसरली. शिवाय, बाळासाहेब ठाकरे असतानाही ठाकरे हा कोणताही ब्रँड नव्हता, असं वादग्रस्त वक्तव्य करत उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. या विधानांनी नवा राजकीय पेटता प्रसंग निर्माण केला आहे.

NMC : नागपूरचं शहरसौंदर्य बोलकं झालंय

संजय गायकवाड यांच्या विधानामागे हिंदी सक्तीचा निर्णय आणि त्याला दिलेला विरोध हा मूळ मुद्दा आहे. मात्र, त्यासाठी छत्रपतींना उद्देशून वादग्रस्त प्रश्न विचारणे, यावरून सत्ताधाऱ्यांची संवेदनशीलता आणि महापुरुषांविषयीचा आदर, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला असून, जनतेतूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही, ही भूमिका अनेकांनी स्पष्ट केली आहे. संजय गायकवाड यांनी खुली माफी मागावी, अन्यथा जनतेच्या न्यायालयात याची किंमत चुकवावी लागेल, असं सांगण्यात येत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!