देश

Vijay Wadettiwar : जमवा, सावरून बसा, आम्ही येतोय गोळ्या घालायला

Congress : बॉम्ब आधी उघडपणे, पण प्रश्न विचारले तर देशद्रोही ?

Post View : 45

Author

देशासाठी हल्ला करताना शत्रूला आधीच सूचित करणं, हे नव्या काळातलं देशप्रेम मानलं जातं का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर घणाघात करत गंभीर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

भारताचे दहशतवादी विरोधात ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण देशात उत्साहाची लाट उसळली आहे. भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी अनेक मुद्द्यांवर थेट आणि ठाम प्रश्न उपस्थित केले आहेत. देशासाठी हल्ला करताना शत्रूला आधी कल्पना देणे हे देशभक्तीचे लक्षण कसे ठरू शकते? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित करत केंद्राच्या परराष्ट्र व संरक्षण धोरणांवर गंभीर शंका उपस्थित केली.

वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारने पाकिस्तानला आधीच सूचित करून अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला केला. म्हणजेच, आम्ही तुमच्यावर कारवाई करणार आहोत. त्यामुळे तुमचे अतिरेकी व सैन्य आधी हलवा, मग आम्ही रिकाम्या ठिकाणी बॉम्ब टाकतो, असा याचा अर्थ होतो. असा कारभार एखाद्या चित्रपटात शोभेल, पण वास्तविक युद्धात हे हास्यास्पद वाटते, असा टोला त्यांनी लगावला. पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले, 250 किलो आरडीएक्स भारतात कुठून आले? हे इतके मोठे स्फोटक देशात येते तरी कसे, आणि त्यावर सरकारने अजूनही काहीच खुलासा केलेला नाही. हेच आम्ही विचारतो, तर आम्हाला देशद्रोही ठरवले जाते.

Amravati : जिल्हाधिकारी कारभाराची सूत्रे आता आशिष येरेकर यांच्या हाती

जोरदार टीका

विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारण्याचा प्रत्येक नागरिकाचा आणि विरोधकांचा अधिकार आहे. पण जेंव्हा राहुल गांधी यासारखे नेते प्रश्न विचारतात, तेंव्हा सरकार लगेच त्यावर सैन्याचा अपमान झाल्याचा आरोप करते. भाजपला सैन्याचा अभिमान केव्हा वाटू लागला हे देशाला माहित आहे, असा खोचक तुलाही वडेट्टीवार यांनी लगावला. पाकविरुद्ध युद्ध सुरू झाले, तेंव्हा एकाही देशाने भारताला साथ दिली नाही, मदत तर दूरच,” असे सांगून वडेट्टीवार यांनी केंद्राच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. “ज्यांना आपण संकटात मदत केली, त्यांनीही आपली साथ सोडली. ही भीषण बाब आहे आणि याचे गांभीर्य सरकारने ओळखायला हवे.

अमेरिकेच्या इशाऱ्यावरून भारताने पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी केली, असा गंभीर आरोप करत वडेट्टीवार म्हणाले, आपले किती जवान शहीद झाले? किती राफेल विमानांचे नुकसान झाले? सरकारने जनतेला या बाबतीत पारदर्शक माहिती का दिली नाही? हे प्रश्न अनुत्तरित ठेवून सरकार जनतेपासून सत्य लपवत आहे, असे त्यांनी म्हटले. पाकिस्तानने चिनी बनावटीच्या 15 हजार रुपयांच्या ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला. आपल्याकडून प्रत्युत्तर म्हणून 15 लाखांचे क्षेपणास्त्र वापरले गेले, हे दुर्दैवी आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. यामागे चीनचा डाव असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. पण सरकारने यावर कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही.

Akola : भाजप, राष्ट्रवादी न सेना; लोकांचे प्रश्न कुणी गांभीर्याने घेईना

युद्धानंतर विजयोत्सव

शस्त्रसंधी झाल्यानंतर केंद्र सरकारने रॅली काढून विजयाचा जल्लोष केला, यावरही त्यांनी आक्षेप घेतला. ही पहिलीच वेळ आहे की युद्धानंतर कोणतेही स्पष्ट चित्र न देता विजयाचा डंका वाजवण्यात आला आहे, अशी टीका त्यांनी केली. आम्ही सैनिकांच्या शौर्याला सलाम करतो, पण सरकारच्या मौनाला प्रश्न विचारतो. प्रश्न विचारणे हे देशप्रेम आहे, देशद्रोह नव्हे. अशा ठाम शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी संवादाचा शेवट करत, देशातील लोकशाही, सुरक्षा आणि पारदर्शकतेबाबत केंद्र सरकारला सुनावले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!