महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी Mahayuti ची आश्वासने मतदारांसाठी गाजर

काँग्रेस हायकमांडशी उद्धव ठाकरेंची चर्चा अद्याप झाली नसल्याचे Vijay Wadettiwar म्हणाले

Author

 महाविकास आघाडी टिकविण्याचा प्रयत्न असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. तर महायुती सरकार मतदारांना फिरवित असल्याची टीका.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चर्चा रंगत आहे. परंतु काँग्रेस अजूनही आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकाही केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकासआघाडी असावी आणि ती आघाडी टिकावी, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत. महाविकास आघाडीतील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्टपणे जाहिर केलेली नाही. त्यांच्या भूमिकेबाबत अजून काँग्रेस हायकमांडशी चर्चा झालेली नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Bhandara जिल्ह्यातील आयुध निर्माण कारखान्यात मोठा स्फोट 

सत्ता येताच शब्द विसरले 

दरम्यान महायुती सरकारवर निशाणा साधत वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकार बेईमान आहे. त्यांनी दिलेला शब्द ते आता फिरवित आहेत. अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. लाडक्या बहिणींना 2 हजार 100 रुपये देण्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु महायुतीची सत्ता येताच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी वरून महायुती मधील मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे. एसटी, रिक्षा, टॅक्सी भाववाढ करतील. चार वर्ष लोकांकडून पैसे घेतील आणि निवडणुका आल्या की, एक हजार रुपये वाटून मत घेतील. हेच या सरकारचे काम आहे, अशी जहरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार ते म्हणाले की, निवडणुका झाल्या मते मिळाली. आधी लाडकी बहिण योजनेतून महायुती सरकारने महिलांना अपात्र केले. आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार! असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांनी आश्वासन दिली होती. परंतु आता महायुती सरकारच्या मतभेदांच्या जाळ्यात ती आश्वासन अडकली आहेत. निवडणुकीपूर्वी जी आश्वासने ‘जाहीरनामा’ म्हणून जनतेसमोर ठेवली होती. ती सर्व मुळात मतदारांसाठी गाजरच होती हे आता उघड होत आहे. म्हणूनच आता अर्थमंत्र्यांच्या मते शेतकरी कर्जमाफी ‘तिजोरीवरचा भार’ ठरू शकते असे पुढे आले आहे. एकंदरीत आधी वचन देणे आणि नंतर निधीचे कारण देऊन ती पूर्ण न करणे हा जनतेचा विश्वासघात नाही का? शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि विश्वासाचे आदर करणारे हे सरकार नाही असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!