महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मंदिरात नव्हे, सत्तेच्या मांडवात देवाची राजवट

Congress :धर्मावरून सत्तेची चाकं फिरवणाऱ्यांना वडेट्टीवार यांचे सडेतोड उत्तर

Post View : 20

Author

राजकारणाच्या रंगमंचावर जेव्हा धर्माच्या नावावर नाट्य उभं राहतं, तेव्हा विजय वडेट्टीवार यांचा आवाज सत्याच्या पडद्यामागून घणाघाती भाष्य करतो.धार्मिक पोकळपणावर राजकीय सडेतोड प्रतिउत्तर देत त्यांनी लोकशाहीच्या नाभीवर ठामपणे बोट ठेवलं आहे.

राजकारणाचे व्यासपीठ हे पूर्वी विचारमंथनाचे केंद्र होते. पण आज ते धार्मिक तणाव व पोकळ मुद्द्यांच्या तमाशांनी व्यापले आहे. अशा पाश्र्वभूमीवर विधान सभेतील काँग्रेसचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या एका धार्मिकतेच्या मुद्द्यावर सडेतोड आणि ठसठशीत उत्तर देत भाजपच्या राजकीय पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. मुस्लिम अध्यक्षावरून काँग्रेसला उद्देशून विचारण्यात आलेल्या विधानाचे त्यांनी राजकीय विश्लेषण करत भाजप व संघाच्या नेतृत्वावर घणाघाती टीका केली.

वडेट्टीवार यांनी केलेला पलटवार सत्तेच्या माध्यमातून धर्माच्या नावावर सुरू असलेल्या दुटप्पीपणावर त्यांनी थेट प्रहार केला. धर्माच्या नावाने भावनांना कुरवाळत सत्ता गाजवणाऱ्यांना त्यांनी अत्यंत प्रभावी भाषेत प्रत्युत्तर दिलं. धर्म, सत्ता आणि समाज या तिघांमध्ये असलेली सीमारेषा लोप पावत चालल्यास ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरते, हा स्पष्ट संदेश वडेट्टीवार यांच्या भूमिकेतून झळकला.

Wardha : गडकरी बोलले आणि काम झाले

भगवंताची विटंबना

राजकारणात भगवंताचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी एक तात्त्विक आणि भावनिक आवाज दिला. देव हा मंदिरात नाही, तर श्रद्धेच्या ठिकाणी असावा, हे सांगतानाच त्यांनी देवाचं नाव घेऊन चालवण्यात येणाऱ्या भ्रष्ट राजकारणावर ताशेरे ओढले. राजकीय फायद्यासाठी धर्माला वापरण्याची परंपरा ही श्रद्धेची विटंबना आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होतं.

देवाचं नाव घेऊन जेव्हा सत्ता भूक वाढवली जाते, तेव्हा तो देव समाजासाठी आश्रय राहात नाही, तर फक्त घोषणा उरतो. वडेट्टीवार यांचे हे भाष्य एका जागृत समाजाच्या भावनांचं प्रतिबिंब होतं. धर्माच्या नावावर केलेले खेळ बंद व्हावेत, हीच त्यांच्या शब्दांमागची आंतरिक आर्तता होती.

Nagpur : बोगस शिक्षण घोटाळ्यात मृत अधिकारी बनले साक्षीदार

धर्मनिरपेक्षतेचा झेंडा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मुस्लिम समाजाच्या हितासाठी काही न केल्याचा आरोप केला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाकडे बोट दाखवत, मुस्लिम प्रतिनिधित्वावरून सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवरच शंका उपस्थित केली. या प्रतिकात्मक प्रहारातून त्यांनी सत्ता आणि समतेच्या कल्पनेतले दांभिक स्वरूप उघडं पाडलं.

एकाही मुस्लिम मंत्र्याला संधी न देणाऱ्या सरकारला अल्पसंख्याकांसाठी बोलण्याचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत वडेट्टीवार यांनी समाजातील खरेदारीचे राजकारणही उघड केले. त्यांच्या वक्तव्यांमध्ये संयम होता, पण त्याचबरोबर ते सत्ताधाऱ्यांच्या खोट्या घोषणांवर चोख प्रत्युत्तर देणारे ठरले.

 

 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!