महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : आज तुमचे दिवस, कल हम भी चुन चुन कर बदला लेंगे 

Congress : तुम्ही आज फोडा, उद्या आम्ही फोडणार तेव्हा कसे सावरणार? 

Post View : 46

Author

राजकीय रणधुमाळीत एक धगधटलेलं वक्तव्य सध्या केंद्रस्थानी आहे. विजय वडेट्टीवारांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवत ठाम शब्दांत इशारा दिला आहे. 

राज्यातील राजकारण सध्या अक्षरशः उफाळून येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका व्हायरल वक्तव्याने राजकीय वातावरण अधिकच तापवलं आहे. यामध्ये बावनकुळे काँग्रेसला फोडण्याचे आणि रिकामं करण्याचे आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना देताना ऐकू येतात. हे वक्तव्य समोर आल्यानंतर काँग्रेसकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर निशाणा साधत जोरदार पलटवार केला आहे. एका बाजूला ते सामाजिक सलोखा आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या सद्भावना रॅलीतून संवाद साधत होते. तर दुसऱ्या बाजूला त्यांनी अत्यंत ठाम आणि आक्रमक भाषेत भाजपाला स्पष्ट इशारा दिला. ‘आज तुमचे दिवस आहेत, पण उद्या आमचेही दिवस येतील. हम भी चुन चुन कर बदला लेंगे.’

प्रत्येकाचं घर काचेचं

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘काँग्रेसला फोडा’ या विधानानंतर संपूर्ण काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजपची ही फोडाफोडीची राजकारणाची जुनी सवय असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी भाजपच्या नैतिकतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी म्हटलं, राजकारणात प्रत्येकाचं घर काचेचं असतं. एकमेकांची घरं फोडण्याचं काम केलं, तर कालांतराने आपल्याही घरावर दगड फेकले जातील.

Yashomati Thakur : मत चोरून सत्तेत आलात, तरीही काँग्रेसचीच भीती

वडेट्टीवार यांनी भाजपच्या जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या रणनीतीवर सडकून टीका केली. या देशात आणि राज्यात जातीयतेचं आणि धर्मांधतेचं विष पेरण्याचं काम सुरू आहे. पण हे लोक विसरतात की खऱ्या अर्थाने जनतेचं मन जिंकलं जातं ते विकासाच्या माध्यमातून, द्वेषाच्या नव्हे. त्यांच्या मते, सद्भावना रॅली ही केवळ एक राजकीय मोर्चा नसून, ती मने जोडण्याचा एक प्रयत्न आहे. जी दरी गेल्या काही वर्षांत समाजात निर्माण झाली आहे, ती रॅली मिटवण्याचा प्रयत्न करते आहे. या आंदोलनामागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांच्या ‘हम भी चुन चुन कर बदला लेंगे’ या वक्तव्यातील बदला हा राजकीय सूड असल्याचे म्हटले जात आहे. या घमासान संघर्षानंतर राज्यातील राजकारण आणखी धगधगणार हे निश्चित. एका बाजूला भाजपच्या रणनीतीवर प्रश्न उभे राहतात, तर दुसरीकडे काँग्रेसकडून पुन्हा एकदा आक्रमकता आणि जागरुकतेचं दर्शन होत आहे. आज सत्ताधाऱ्यांचे दिवस असले, तरी लोकशाहीत सत्तेचे दिवस सदा कायम नसतात, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी ‘हम भी चुन चुन कर बदला लेंगे’ असा सूचक इशारा दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!