महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : पर्यटकांचे प्राण गेले, पण तुम्ही उपकार गिनता

Congress : ही मदतीची वेळ आहे, मार्केटिंगची नाही

Author

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दांत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर काही पर्यटक तिथेच अडकले असून, त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तातडीने प्रयत्न सुरू झाले आहेत. अशातच, शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन थेट श्रीनगरमध्ये दाखल झाले. नरेश म्हस्के यांनी रेल्वेने गेलेली लोकं पहिल्यांदाच विमानात बसत आहेत. असं विधान करत त्यांनी शिंदेंच्या प्रशासकीय सक्रियतेचं गुणगान गायलं. मात्र, या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हस्के यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले, ही वेळ मदतीची आहे, स्वतःचं मार्केटिंग करण्याची नाही. त्यांनी सवाल केला की, जे लोक पहिल्यांदाच विमानात बसले, त्याचं श्रेय घेणं कितपत योग्य आहे.

Pahalgam : बुलढाण्याचे नागरिक सुखरूप घरी

संकटकाळात श्रेयवादाची स्पर्धा

पर्यटकांना सुरक्षित परत आणणं महत्त्वाचं की विमानप्रवासाचं राजकारण? वडेट्टीवार यांचा आरोप आहे की, महायुती सरकारमधील नेते अशा संकटकाळातही श्रेय घेण्याची आणि प्रसिद्धी मिळवण्याची स्पर्धा करत आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा माणसं भीतीने थरथरत होती, तेव्हा सरकारचे प्रतिनिधी तिथे कोण आधी पोहचतो याची शर्यत लावत होते. आता पत्रकार परिषदांमध्ये उपकार गिनले जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, \एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सजग झाली.

45 लोक पहलगाममध्ये अडकले होते. ते रेल्वेने गेले होते. त्यांना सीआरपीएफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं. अन्नाची कमतरता होती. शिंदेंनी त्यांना विमानतळावर आणलं. आणि हो, ते पहिल्यांदाच विमानात बसले. या विधानात विमानप्रवास हा मुद्दा ठळकपणे पुढे येत असल्याने विरोधकांनी त्याला संवेदनशून्यता मानलं आहे. वडेट्टीवारांनी म्हटलं, ही वेळ आहे मदत करण्याची, श्रेय घेण्याची नाही. सरकारमधील मंत्र्यांनी आणि खासदारांनी तरी किमान अशा संकटाच्या वेळेस जबाबदारीने वागावं. दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप जिवांचा बळी गेला आहे.

Parinay Fuke : पूर्व विदर्भात गाळमुक्त योजनेचे जलपर्व सुरू

अनेक कुटुंबं अजूनही शोकसागरात बुडालेली आहेत. अशा परिस्थितीत, राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवाद आणि विधानांच्या वादावरून कलगीतुरा रंगताना दिसतोय. हल्ल्यापेक्षा कोण विमानात बसलं यावर जास्त चर्चा होत असल्याने, सोशल मीडियावरही नागरिक संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशा संकटसमयी राजकारण न करता, एकत्र येऊन गरजूंना मदत करावी, हीच अपेक्षा आता जनतेकडून व्यक्त होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!