प्रशासन

Vinod Agrawal : ओळखीला मिळाला हक्काचा दस्तऐवज

Caste certification : विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे मातंग गारोडी समाजात परिवर्तन

Author

मातंग गारोडी समाजातील 227 कुटुंबांना जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा उपक्रम आमदार विनोद अग्रवाल आणि जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला.

कुड़वा ग्रामपंचायतीतील मातंग गारोडी समाजासाठी 20 एप्रिल हा दिवस एक महत्त्वाची नोंद करणारा ठरला. वर्षानुवर्षे शासनाच्या योजनांपासून वंचित असलेल्या 227 कुटुंबांना आमदार विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांतून जात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा दिवस फक्त कागदोपत्री ओळख मिळवण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर हा समाज आता मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकत आहे.

मातंग गारोडी समाजाला आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्मदाखला, शैक्षणिक कागदपत्रे नसल्यामुळे मूलभूत सुविधा आणि शासकीय लाभ मिळवण्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. मात्र आमदार विनोद अग्रवाल आणि जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या नेतृत्वाखाली या अनोख्या उपक्रमातून मातंग गारोडी समाजाला पुन्हा एकदा नव्या आशेचा किरण मिळाला.

Hamid Engineer : नागपूर दंगलीतला प्रमुख चेहरा जामिनावर बाहेर

लोकाभिमुख पुढाकार

मातंग गारोडी समाजामध्ये हा बदल अचानक घडलेला नाही. कुड़वा येथील मातंग गारोडी वस्तीमध्ये आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वतः जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांनी त्यांचे प्रश्न ऐकले आणि त्वरित कृती करण्याचा निर्धार केला. 28 फेब्रुवारीला पालावर्ची शाळेत घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत कार्ययोजना आखून महसूल विभागाला आदेश दिले की, जात प्रमाणपत्राची प्रक्रिया त्वरीत पार पाडावी.

जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता या समाजातील मुलांना शैक्षणिक आरक्षण, शिष्यवृत्ती, घरे, रोजगार योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. ही केवळ सरकारी मदत नाही, तर त्यांच्या सन्मानाचा दस्तऐवज आहे. या प्रमाणपत्रामुळे एका समाजाची अनेक पिढ्यांची उपेक्षा आता सन्मानात रूपांतरित होत आहे.

Parinay Fuke : पोलिस पाटलांच्या संघर्षात भाजप पाठीशी

विकासकामांचे आश्वासन

आमदार विनोद अग्रवाल यांनी वस्तीमध्ये वीज, बोरवेल, पाण्याची टाकी, मोदी आवास योजना अंतर्गत घरे आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. याच कार्यक्रमात त्यांनी पालावर्ची शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोरसे यांच्या कार्याचे विशेष उल्लेख केला आणि भविष्यातील गरजेनुसार सहकार्य देण्याचं वचन दिलं.

आमदार विनोद अग्रवाल यांच्या लोकाभिमुख नेतृत्वामुळे मागासलेल्या समाजाला सन्मान, हक्क आणि ओळख मिळाली. या कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी प्रजीत नायर, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, एसडीओ खंडाईत, तहसीलदार शमशेर पठाण, अपर तहसीलदार कांबळे, माजी सभापती पूजा अखिलेश सेठ, उपसरपंच कमल फरदे, जिल्हा परिषद सदस्या अनंदा वाढीवा, तलाठी भोयर, समाजसेवक प्रशांत बोरसे यांच्यासह मंडळ अधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!