
राज्यात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी वाशिम एक आहे. या परिस्थितीत ‘ऑपरेशन द्रोणागिरी’साठी वाशिम जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
‘ऑपरेशन द्रोणागिरी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी देशातील सहा विशेष जिल्ह्यांमध्ये वाशीमची निवड करण्यात आली आहे. वाशीम जिल्ह्याला ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवी ओळख निर्माण करून देणारा उपक्रम सिद्ध होणार आहे. वाशीम जिल्ह्यात कृषी क्षेत्रात ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानाचा उपयोगाचा प्रयोग करण्यात येईल. महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणून वाशीमची निवड झाली.
डिसेंबर 2022 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने राष्ट्रीय जिओस्पेशियल धोरण सुरू केले होते. या धोरणांतर्गत भारताला ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानात प्रगत होण्याचे उद्दिष्ट ठेवले. शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा या उपक्रमाद्वारे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा मुख्य हेतू राहणार आहे. जून 2025 पर्यंत देशातील पाच राज्यांतील सहा जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.

Manoj Jarange Patil: आता मंत्र्यांच्या मुलांना धरायचं अन् हाणायचं!
ही आहेत जिल्हे
या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्याचा समावेश आहे. हरियाणातील सोनीपत आणि गुरुग्राम, उत्तर प्रदेशातील वाराणसी, आंध्र प्रदेशातील विजयनगर आणि आसाममधील कामरूप या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ट क्षेत्रांशी संबंधित आव्हानांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून निवडण्यात आले. वाशीम जिल्ह्यात कृषी क्षेत्रात ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पांतर्गत नवे तंत्रज्ञान आणि उपाय उपलब्ध होणार आहे. प्रकल्पात ड्रोनच्या साहाय्याने कृषी क्षेत्रात केवळ उत्पादनच वाढणार नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रम आणि खर्चातदेखील बचत होणार. वाशिमला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण होणार. पीक उत्पादन, मातीचे संरक्षण आणि पाणी व्यवस्थापन या प्रकल्पामुळे अधिक प्रभावी होणार आहे. ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानाविषयी शेतकरी, युवक आणि महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील समस्या व प्रश्नांवर ड्रोनद्वारे अचूक माहिती गोळा करून उपाययोजना करण्यात येईल. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत, त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांची अंमलबजावणी वाशिम जिल्हा नीती आयोगाने महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केले. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने मागासलेल्या जिल्ह्यांपैकी वाशिम जिल्हा एक आहे. त्यामुळे विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाते. अशामध्ये ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘ऑपरेशन द्रोणागिरी’मुळे तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला जाईल. ड्रोनच्या माध्यमातून अचूक फवारणी, पिकांचे आरोग्य निरीक्षण, आणि कीड व रोग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार. याव्यतिरिक्त स्थानिक युवक आणि महिलांना ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हा उपक्रम एक ‘गेम-चेंजर’ ठरेल, याचा आम्हाला विश्वास असल्याचे वाशिमचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस म्हणाले आहेत.