देश

Yashomati Thakur : बेरोजगारी, भ्रष्टाचार अन् लाठीचार्ज

Patna Student Protest : मोदी-नितीश कुमार सरकारचा खोटारडेपणा उघड

Post View : 16

Author

देशात सध्या बिहारमध्ये रोजगाराच्या संधी खूप कमी असल्यामुळे तरुण सातत्याने आपल्या हक्कासाठी प्रयत्न करत आहेत. अशाच परिस्थितीत, पाटणा येथे बेरोजगार तरुणांनी प्रदर्शन केले.

सोमवारी (15 सप्टेंबर रोजी) बिहारची राजधानी पाटणा शहरात एक असा गदारोळ माजला की, तरुणांच्या असंतोषाचा ज्वालामुखी फुटला. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, हातात तिरंगा धरून ते जोरदार निदर्शने करत होते. त्यांची एकच मागणी होती, पोलिस उपनिरीक्षक भरती परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर राबवा. राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेले हे तरुण पाटणा कॉलेजजवळ जमले आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच करण्याच्या तयारीत होते. पण, हे स्वप्नाळू तरुणांच्या मार्गात पोलिसांचे बॅरिकेड्स आणि लाठ्या आल्या.

निदर्शकांचे म्हणणे स्पष्ट होते, निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करण्यापूर्वीच सरकारने पोलिस भरती पूर्ण करावी. त्यांच्या डोळ्यात रोजगाराची आशा होती, पण प्रत्यक्षात त्यांना मिळाला तो लाठीचार्जचा धक्का. जेपी गोलंबरजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावले, तरी हे आंदोलक थांबले नाहीत. ते बॅरिकेड्स तोडून पुढे सरसावले आणि डक बंगला क्रॉसिंगवर पोहोचले. तिथे पोलिस तयारच होते. आंदोलक पुढे जाताच, पोलिसांनी लाठ्या उगारल्या आणि निदर्शकांना पांगवले. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले. पण त्यांच्या मनातील आग मात्र विझली नाही. या निदर्शनांमागे एक गहन पार्श्वभूमी आहे.

Gadchiroli Police : माओवादी हिंसेचा सूत्रधार अखेर ताब्यात 

पारदर्शकतेची मागणी

बिहारमध्ये बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे विद्यार्थी फक्त भरती परीक्षेची मागणी करत नव्हते, तर त्यांच्या भविष्याची हमी मागत होते. ते म्हणतात, सरकारने पारदर्शकता आणावी, वेळेवर परीक्षा घ्याव्यात. पण, या मागण्यांकडे सरकारने कानाडोळा केला आणि पोलिसांना पुढे करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. आयकर चौकाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला, पण शेवटी लाठीमार हाच पर्याय उरला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठाकूर म्हणाल्या, निवडणुकीच्या वेळी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष युवकांना रोजगार देऊ, गरीबांना घर देऊ, महागाई कमी करू, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देऊ अशी मोठमोठी खोटी आश्वासने देऊन सत्तेत येतात. परंतु जेव्हा तरुण आणि सर्वसामान्य जनता जाब विचारते तेव्हा त्यांच्यावर लाठ्या चालवतात. ठाकूर यांनी पुढे सांगितले की, बिहारमध्ये पोलिस उपनिरीक्षक भरतीच्या मागणीसाठी बेरोजगार युवक तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरले असताना, नितीश कुमार आणि मोदी सरकारच्या पोलिसांनी त्यांच्या आवाजाकडे लक्ष न देता उलट निर्दयीपणे लाठीमार केला.

Nagpur Railway : रेल्वे चोरीच्या सराईताला ठोकल्या बेड्या  

नरेंद्र मोदी निवडणुकीत दोन कोटी रोजगाराचे आश्वासन देतात आणि सत्ता आली की युवकांवरती अत्याचार करतात, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या मते, आता बिहारची जनता हे अन्यायकारक वास्तव उघड करून या फसव्या व भ्रष्ट नीतीश-मोदी सरकारला मतपेटीतून नक्कीच धडा शिकवेल.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!