महाराष्ट्र

Yashomati Thakur : राहुल गांधींच्या अवमानावर काँग्रेसचा संताप

Congress : यशोमती ठाकूरांचा दराडेंना थेट इशारा

Author

यशोमती ठाकूर यांनी बाळा दराडेंच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींवर बोलल्यास खपवून घेणार नाही, असा थेट इशारा दिला.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांच्या वादग्रस्त विधानावरून नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे. राहुल गांधी नाशिकमध्ये आले, तर त्यांच्या तोंडाला काळं फासू, असा थेट दम त्यांनी दिला. दराडे म्हणाले, सावरकर आणि हिंदुत्व यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. मविआ कुठं गेलंय माहिती नाही, पण आमचं निष्ठा अजूनही सावरकरांवर आणि हिंदुत्वावर ठाम आहे. यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. यशोमती ठाकूर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षातल्या एका नेत्याकडून अशा प्रकारची भाषा वापरली जाणं, हे निंदनीय असून, ते खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना बाळा दराडे यांनी राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासण्याची धमकी दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर दराडेंनी ही प्रतिक्रिया दिली. मात्र यावर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. यशोमती ठाकूर यांनी दराडेंच्या वक्तव्याला थेट आव्हान दिलं आहे.

Ravikant Tupkar : एल्गाराच्या एका इशाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश वळले

हरताळ फासणारी भाषा

यशोमती ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही गांधीवादी विचारसरणीचे लोक आहोत, शांततेवर विश्वास ठेवतो. पण आमच्या नेत्यावर जर कोणी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण ते सभ्य भाषेत व्यक्त व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी ही विविध विचारसरणीचे पक्ष घेऊन बनलेली युती आहे. परंतु युतीमध्ये राहून एका प्रमुख नेत्यावर अशा प्रकारची धमकी दिली जाते, हे युतीतील आचारसंहितेचा भंग आहे. ठाकरे गटाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांना इतिहास सांगण्याचा अधिकार आहे. त्यांनी सांगितलेला इतिहास हा खरेखुराच आहे आणि तो नाकारता येणार नाही, असं यशोमती ठाकूर यांनी ठामपणे म्हटलं. ज्यांनी स्वतःच्या कुटुंबात देशासाठी बलिदान दिलं आहे, अशा नेत्यावर अश्लाघ्य भाषेत बोलणं हे स्वतःच्या दर्जाला साजेसं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी हे अशा कुटुंबातले आहेत, ज्यांनी आतंकवादाला समोरासमोर पाहिलं आहे. त्यांच्या बाबत बोलताना भान ठेवावं लागतं. त्यांच्या विरोधात असले तरी संयम राखणं ही राजकीय शिष्टाचाराची गरज आहे, हे ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

Akola : वर्दीतला विषारी धूर, अर्चित चांडक यांनी फुंकर घालून विझवला

महाविकास आघाडीत तणाव

घडलेल्या प्रकारामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बाळा दराडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याने ठाकरे गटावर दबाव वाढला आहे. ठाकूर यांनी दिलेला इशारा केवळ एका नेत्याला उद्देशून नाही. तर युतीत राहून आचारसंहिता मोडणाऱ्या कोणत्याही नेत्यासाठी आहे, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, राहुल गांधी यांच्याविरोधात जर कोणी अश्लील, अशोभनीय किंवा धमकीवजा शब्द वापरत असेल, तर तो अजिबात सहन केला जाणार नाही.

काँग्रेसने संयम ठेवला असला तरी तो दुर्बलतेचा संकेत समजू नये. त्यांच्यावर व त्यांच्या नेत्यांवर अशा पद्धतीने बोललं जाणं, ही काँग्रेसला अजिबात मान्य नाही. या सर्व प्रकरणामुळे राज्यातील राजकारण अधिक तापलं आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत संतुलन ढासळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. यशोमती ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसने आपली हद्द स्पष्ट केली आहे. आता ठाकरे गट या मुद्यावर काय भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!