महाराष्ट्र

Yavatmal : निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली

High Court : 20 डिसेंबरला होणार काही भागात मतदान

Post View : 253661

Author

यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काही भागातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात नवी राजकीय घडामोड घडली आहे. काही ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं मतदान आता 20 डिसेंबर रोजी होणार. नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या संदर्भात यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढले आहेत.

वणी, दिग्रस आणि पांढरकवडा येथील काही प्रभागांसाठी मतदानाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी होत असलेली निवडणूक देखील आता सुधारित तारेखनुसार होणार आहे. नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक पदांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार होते. त्याऐवजी आता 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

Bhandara : भाजप उमेदवारांच्या कृतीने वादाचा भडका

सुधारित आदेश लागू

यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी रविवारी रात्री उशिरा यासंदर्भात आदेश काढले. राज्य निवडणूक आयोगाने 28 नोव्हेंबरच्या रात्री सुधारित निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.सुधारित आदेशानुसार, यवतमाळ नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, न्यायालयात अपील प्रलंबित होती.

नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 मधील विविध कलमानुसार काही भागात प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यामुळं काहींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या निकालामुळं प्रक्रियेत काहीसा बदल झाला आहे.

Bhandara : नानांचा निर्णय ठरणार योग्य!! काँग्रेसला विजयश्री शक्य

नव्यानं अर्ज नाही

आयोगाच्या निर्देशानुसार, अशा जागांसाठी नवीन निवडणूक वेळापत्रक लागू केले जाईल. तेथे मतदान 20 डिसेंबरला होईल. मतमोजणी 21 डिसेंबरला होईल. तोपर्यंत अशा सर्व ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागू असेल. यवतमाळ नगर परिषदेच्या अध्यक्ष तथा नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी नवीन तारीख लागू असेल.

वणी नगर परिषदेच्या प्रभाग 14 (अ) मध्ये देखील नचीन तारखेला मतदान होईल. दिग्रस नगर परिषदेच्या प्रभाग 2 (ब), 5 (ब), आणि 10 (ब) येथेही सुधारित वेळापत्रक लागू असेल. पांढरकवडा नगर परिषदेतील प्रभाग 8 (अ) आणि 11 (ब) यांचाही नव्या वेळापत्रकात समावेश आहे. यवतमाळ वगळता जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांमध्ये यापूर्वी जाहीर निवडणूक कार्यक्रम लागू असेल. यवतमाळ नगर परिषदेतील स्थगित जागांमध्ये नगराध्यक्ष पदाचाही समावेश आहे.

नियमानुसार प्रक्रिया

निवडणूक नियमानुसार, जिथे अध्यक्षासाठी निवडणूक पुढे ढकलली जाते, तिथे संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलणे बंधनकारक असते. निवडणुकीचे वेळापत्रक बदलले आहे. मात्र त्यासाठी नव्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गरज नाही. ज्या वॉर्डांत आक्षेप होते. त्यांचीच छाननी केली जाईल. त्यानंतर माघार घेण्याची नवीन अंतिम तारीख दिली जाईल. इतर वॉर्डांमध्ये कोणताही बदल नसेल.

सुधारित निवडणूक वेळापत्रक 4 डिसेंबर रोजी जाहीर केले जाईल. माघार घेण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर असेल. अंतिम यादी 11 डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. 20 डिसेंबर रोजी मतदान होईल. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. नवीन तारखांमुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार आणि नेत्यांना आणखी जोर लावावा लागणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!