यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून रुग्णसेवेच्या सुविधांचा सखोल आढावा घेतला.
पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यवतमाळच्या रुग्णांसाठी कोणतीही सुविधा कमी पडू नये, यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. नुकताच त्यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध सुविधा, डॉक्टर सेवा आणि रुग्णांची सोय कशी वाढवता येईल, याचा सखोल आढावा घेतला. पालकमंत्री राठोड यांनी सांगितले की, मी पालकमंत्री झाल्यापासून जवळपास शंभर कोटी रुपयांचा निधी वैद्यकीय महाविद्यालयासाठी दिला आहे. भविष्यातही या सुविधांसाठी निधीची कधीही कमतरता होणार नाही. त्याचबरोबर त्यांनी डॉक्टरांना रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा आग्रह देखील व्यक्त केला.
वरिष्ठ डॉक्टरांनी ओपीडीमध्ये थेट उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांनी दिलेले निर्देश विशेष लक्ष वेधून घेणारे होते. त्यांनी सांगितले की, बाह्यरुग्ण कक्षात वरिष्ठ डॉक्टरांची नियमित उपस्थिती असावी. सोनोग्राफी, शस्त्रक्रिया यासाठी रुग्णांना जास्त दिवस वाट पाहावी लागू नये. तसेच नोंदणी कक्ष वाढवण्याचा विचार करावा, कारण रुग्णांना लांब रांगा लावून वेळ घालवावा लागत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढण्याची अडचण होऊ नये, यासाठी योग्य व्यवस्था करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन अत्याधुनिक एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांची भूमिका दलालीपेक्षा कमी नाही
नर्सिंग अभ्यासक्रमाचा प्रस्ताव
पालकमंत्र्यांनी याची चाचणी करून या महिन्याच्या अखेरपर्यंत ही मशीन सुरू करावी, असे सूचित केले. तसेच, मृत्यूच्या नोंदींसाठी शवविच्छेदन कार्य सायंकाळी ६ नंतरही सुरू ठेवण्याची आणि आठवड्याच्या आत अहवाल दिला जाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. जेणेकरून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना त्रास कमी होईल. महाविद्यालयात बीएससी नर्सिंग आणि जीएनएम अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावरही पालकमंत्र्यांचा पाठपुरावा सुरू आहे. ज्या विभागांचे पोस्ट ग्रॅज्युएशन बंद झाले आहेत, त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले.
पालकमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छता, सुरक्षा, रुग्णांचा पोषण आहार, सिकलसेल रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी नवजात शिशुंच्या अतिदक्षता कक्ष, बालरोग विभाग, महिला विभागासाठी नवीन शस्त्रक्रिया गृह, एमआरआय कक्ष, सीटी स्कॅन कक्ष आणि शल्यक्रिया विभागांची सखोल पाहणी केली. खनिज विकास व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारलेल्या नव्या सुविधांचीही तपासणी केली गेली. यवतमाळच्या आरोग्य क्षेत्रात पालकमंत्री संजय राठोड यांची कामगिरी निश्चितच नवीन पर्वाची सुरुवात ठरणार आहे. जिथे रुग्णसेवा हा केंद्रबिंदू आहे. येत्या काळात या महाविद्यालयातून मिळणाऱ्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचा विश्वास स्थानिकांना आहे.
Nagpur : मृतदेह झाला साक्षीदार, महापालिका विरोधात कुटुंबाचे आंदोलन