महाराष्ट्र

वडिलांच्या हत्या प्रकरणावरून Zeeshan Siqqique यांचा मोठा दावा 

अनेक नामांकित व्यावसायिक आणि राजकीय नेत्याचा हत्या प्रकरणाशी संबंध ?

Post View : 18

Author

ऑक्टोबर 2024 मध्ये बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. यावरून झिशान सिद्दिकी त्यांनी मोठा खुलासा केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या मध्ये पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदविला होता. वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या जबाबात झिशान सिद्दिकी वडिलांची हत्या वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच घडल्याचा दावा त्यांनी केला होता.

झिशान सिद्दिकी म्हणाले की, “बांधकाम व्यावसायिकांच्या त्रासामुळे स्थानिक रहिवाशांनी माझ्या वडिलांशी संपर्क साधला होता. या परिसरातील 10 बांधकाम व्यावसायिकांबाबत तक्रार आली होती. माझ्या वडिलांना डायरी लिहायची सवय होती. या डायरीत त्यांनी या सगळ्या बिल्डर्सची नावे लिहून ठेवली आहेत. 12 ऑक्टोबरला जेव्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्यादिवशी आपल्या वडिलांनी डायरीत एक शेवटचे नाव लिहले होते. हे नाव म्हणजे भाजपचे मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.

महायुतीचे Jay & Veer पुन्हा दिसले सोबत

या लोकांचा डायरीत उल्लेख

बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणी पोलिसांनी त्यांचे चिरंजीव झिशान सिद्धीकी यांनी पोलीस जबाबात अनेक बिल्डिर्स आणि भाजप नेते मोहीत कंबोज यांचे नाव घेत संशय व्यक्त केला आहे. पोलिसांच्या आरोपपत्रात बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकीत विकासकांच्या नावांचा उल्लेख केला आहे.

झिशान यांनी दावा केला आहे की, त्यांच्या वडिलांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ दिली जाणार होती. परंतु त्यापूर्वीच त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांना शपथ देण्यात आली. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत म्हटलं आहे की, झिशान सिद्दिकी यांनी उल्लेख केलेल्या नावांपैकी कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे नाहीत. हल्लेखोरांना आम्ही ताब्यात घेतले आहे. अनमोल बिश्नोई हा या घटनेचा सूत्रधार आहे, असे आतापर्यंतच्या तपासात माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

झिशान सिद्दिकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात वडिलांची हत्या वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंतरच घडल्याचा दावा केला आहे. परंतु दाखल केलेल्या आरोप पत्रात बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा पुर्नविकास प्रकल्पाशी कुठलाही संबध नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. बाबा सिद्धीकी यांची हत्या बिष्णोई गँगकडून झाली आहे, यावर मुंबई पोलिस ठाम आहेत. परंतु या लोकांचे वांद्रे येथील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांवरून बाबा सिद्दिकी यांच्याशी मतभेद होते, असे झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या जबाबात नमूद केलं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!