चंद्रपूर जिल्ह्यातील जगविख्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं हे शक्य झालं आहे.
विदर्भाच्या मातीत असलेले चंद्रपूर जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळं चंद्रपूर आकर्षणाचं केंद्र आहे. व्याघ्र दर्शन घेण्यासाठी जगभरातून पर्यटक ताडोबात येतात. क्रिकेट खेळाडू सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेक बॉलीवूड स्टार ताडोबात सतत येतात.
देश-विदेशातील राजकीय मंडळी देखील या व्याघ्र प्रकल्पाच्या मोहात आहेत. आता या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कायापालट होणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच आग्रही असतात. असाच आग्रह त्यांना ताडोबा प्रकल्पाच्या विकासासाठी धरला.
.
फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकरचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी व रेन मॅटर फाऊंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत. तसा करारही करण्यात आला आहे.
जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यानुसारच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात पर्यावरणीय पुनरुज्जीवन होणार आहे.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या खनिज वैभवातून रोजगाराची भरभराट
पहिला प्रयोग
पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्रात पहिलाच प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ताडोबामध्ये हा प्रकल्प राबविला जाईल. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबरच फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या सहकार्याने झिरोधा व रेनमॅटर फाऊंडेशन ही संस्था काम करणार आहे.
प्रकल्पासाठी झिरोधा एक हजार कोटी रुपयांचा रिवाइल्डिंग फंड देणार आहे. हा विशेष निधी असेल. ताडोबा प्रकल्पासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे. विशेष म्हणजे झिरोधा आणि रेनमॅटर फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरणीय व सामाजिक उपक्रम राबवले जातात. रेनमॅटर फाउंडेशनमार्फत हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांवर काम करत आहे.
झिरोधा आपल्या नफ्यातील दहा टक्के निधी समाजहितासाठी खर्च करते. त्यासाठी निधी राखीव ठेवला जातो. झिरोधाने 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम ‘झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ म्हणून जाहीर केली आहे.
जाहीर निधीतून देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. देशात विविध ठिकाणी मोनोकल्चर वृक्षलागवडीला पर्याय देण्यात आला आहे. त्याऐवजी जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीचा वापर होणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. त्यातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील 800 एकरच्या प्रकल्पाचा समावेश आहे.
र्यावरण संवर्धनासाठी झिरोधासारख्या कार्पोरेट कंपन्या सहभागी होत आहेत. त्यांच्या सहभागाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही हा प्रकल्प आदर्श ठरेल. महाराष्ट्र शासन आणि वन विभागासोबतचे झिरोधाचे सहकार्य फलदायी ठरेल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
