महाराष्ट्र

Devendra Fadanvis : विदर्भातील हेल्थकेअरमध्ये मोठी झेप

Narendra Modi : हृदयाचे ठोके आता मातृभाषेतून समजणार

Post View : 16

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यात त्यांनी माधव नेत्रालयाच्या इमारतीची पायाभरणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व सांगत नेत्ररोग संशोधनासाठी हा केंद्रबिंदू ठरेल असे नमूद केले.

गुढीपाडव्याच्या मंगलमय वातावरणात, नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शतकोत्तर सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी नागपूरला भेट दिली. आपल्या दौऱ्याच्या प्रारंभी, पंतप्रधान मोदींनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळ, दीक्षाभूमीला भेट देऊन आदरांजली वाहिली.

मोदींच्या या दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासूनच  पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित आहेत. सकाळी नऊ वाजता नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर पोहोचले, तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. या महत्त्वपूर्ण दौर्‍यादरम्यान, त्यांनी नागपूरच्या माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यातही सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी नेत्रहीन  व्यक्तींसाठी केलेल्या सेवेचे कौतुक केले.

Narendra Modi : चटके लावणाऱ्या उन्हात अख्खं नागपूर रस्त्यावर

संशोधनाचे प्रमुख केंद्र

माधव नेत्रालय डोळ्यांच्या उपचारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. आजच्या पायाभरणी सोहळ्यामुळे हजारो लोकांना नवीन दृष्टी मिळेल. हे नेत्रालय नागपूरच्या माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरची विस्तारित इमारत आहे. संपूर्ण मध्य भारतासाठी हे नेत्ररोग उपचार आणि संशोधनाचे प्रमुख केंद्र ठरेल. असं फडणवीस यांनी नमूद केले.

माधव नेत्रालयामध्ये कॉर्निया प्रत्यारोपण, लॅसिक शस्त्रक्रिया, ग्लॉकोमा उपचार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बाल नेत्ररोग उपचार, नेत्ररोग ऑन्कोलॉजी, ऑक्युलोप्लास्टी आणि कमी दृष्टीसाठी विशेष विभाग असतील. याशिवाय, नेत्रदानास प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हे रुग्णालय दैनंदिन कार्यकाळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत सुरू राहणार आहे. माधव नेत्रालय केवळ एक वैद्यकीय संस्था नाही, तर समाजात नेत्र आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा महत्त्वाचा उपक्रम ठरेल.

Harish Pimple : मूर्तिजापूरचे आमदार हातात झाडू घेतात तेव्हा…

आयुष्मान भारत योजना

मोदींनीही यावर प्रकाश टाकत सांईगतले की, आज देशाच्या आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. माधव नेत्रालय देखील या परिवर्तनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात ही सरकारची प्राथमिकता आहे. गरीब आणि वंचित नागरिकांनाही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुठलाही देशवासी गरिमापूर्ण जीवनापासून वंचित राहू नये, यासाठी ‘आयुष्मान भारत’ योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.

आयुष्मान भारत या योजनेमुळे लाखो नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. तसेच, हजारो जनऔषधी केंद्रांद्वारे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत औषधं उपलब्ध करून दिली जात आहेत. सध्या देशभरात जवळपास एक हजार डायलिसिस केंद्रे कार्यरत आहेत, जेथे मोफत डायलिसिसच्या सुविधा दिल्या जात आहेत. यामुळे देशवासीयांचे कोट्यवधी रुपये वाचत आहेत आणि लाखो रुग्णांना दिलासा मिळत आहे.

Devendra Fadanvis : भ्रष्टाचारात अडकलेली नागपूर जिल्हा बँक पुन्हा उभारी घेणार

दर्जेदार वैद्यकीय सेवा

मागील दहा वर्षांत गावागावांत आयुष्मान आरोग्यमंदिर उभारण्यात आली आहेत. जिथे नागरिकांना देशातील सर्वोत्तम डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला व उपचार मिळत आहेत. पूर्वी अनेक रुग्णांना योग्य उपचारांसाठी हजारो किलोमीटर प्रवास करावा लागत असे, पण आता ही गरज कमी झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  एम्स (AIIMS) सारख्या अत्याधुनिक हॉस्पिटल्सची संख्या तीन पट वाढली आहे, असंही मोदींनी सांगितले. भविष्यात अधिकाधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच गरीब कुटुंबातील मुलांनाही डॉक्टर बनण्याची संधी मिळत आहे. त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी, वैद्यकीय शिक्षण आता मातृभाषेत मिळण्याचीही सोय करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेत मूलभूत सुधारणा होत आहेत. प्रत्येक नागरिकाला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!