महाराष्ट्र

Parinay Fuke : दादांची काँग्रेसला ‘दफा तीन सौ दो’

Bhandara-Gondia : अविनाश ब्राह्मणकरांच्या विजयाने बाजी

Post View : 42730

Author

भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नावाचा बोलबाला आहे.

Legislative Council Election : भंडारा-गोंदियाच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नावाचा बोलबाला झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत डॉ. फुके यांनी अविनाश ब्राह्मणकर यांना विजयचा चौकार मारायला लावत डॉ. फुकेंनी काँग्रेसला भंडाऱ्यातून ‘दफा तीन सौ दो’ देत पुन्हा एकदा पिंजऱ्यात कोंडले आहे.

या विजयाने आमदार डॉ. परिणय फुके यांनी अविनाश ब्राह्मणकर यांना आमदार बवनूव दाखविण्याचा दिलेला आपला शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील राजकारणात डॉ. फुके यांना तोड नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. फुके ‘एक बार जो कमिटमेंट कर देते है, तो किसी की नही सुनते’, असे आता बोलले जात आहे.

Jacky Rawlani : भाजपच्या पराभवासाठी नरेंद्र भोंडेकरांनी वाटले पैसे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यांचा शब्द खाली जाऊ देत नाही, अशा डॉ. फुके यांनी भंडारा-गोंदियातील विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ. फुकेंनी चक्रव्यूह रचत अविनाश ब्राह्मणकर यांना यश मिळवून दिले. त्यानंतर पुन्हा एकदा या जुळ्या जिल्ह्यांमध्ये भाजपचे वर्चस्व एकहाती सिद्ध झाले आहे.

काँग्रेसची पिछाडी

भंडारा-गोंदियातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक केवळ एका जागेची लढत मानली जात नव्हती. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि भाजपचे बाहुबली नेता आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक बनली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला होती.

Akola BJP :संजय गोटफोडेंची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

अशात आमदार डॉ. परिणय फुके यांनी नरेश ईश्वरकर यांना धूळ चारली. आमदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून आमदार डॉ. फुके यांच्यावर प्रचंड आमराप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. महाविकास आघाडीचे बारा वाजवून डॉ. फुके आणि भाजप दहा ते 12 मतं फोडण्यात यशस्वी झाले.

भाजपची सरशी

काँग्रेस समर्थित ईश्वरकर यांना 154 मतांवर समाधान मानावे लागले. तब्बल 148 मतांच्या फरकाने ब्राह्मणकर विजयी झालेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीतून पुन्हा एकदा भंडारा-गोंदियात एक बाब सिद्ध झाली, ती म्हणजे ‘परिणय दादा है, तो भाजपकी जित मुमकीन है..’ भाजपने जेव्हा जेव्हा आमदार परिणय फुके यांच्यावर जो विश्वास दाखवला, तो त्यांनी सार्थकी ठरविला आहे. विधान परिषद निवडणुकीतून देखील हाच संदेश गेला आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!