महाराष्ट्र

Maharashtra : प्रशासनात पुन्हा उलथापालथ; अकोला, नागपुरात नवे नेतृत्व 

IAS Transfers : फेरबदल्यांचे वादळ; अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका 

Post View : 21

Author

राज्यात पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. अकोला आणि नागपूरसह काही महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः अकोला आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये नव्या IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने 8 एप्रिल 2025 रोजी नवीन बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार आहेत.

बदलांच्या आदेशानुसार, सध्या महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अनिता मेश्राराम यांची बदली अकोला येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. अकोल्याच्या ग्रामीण विकासासाठी हा बदल महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आहे. याच आदेशात नागपूरकरांसाठीही एक महत्त्वाची नियुक्ती झाली आहे. IAS अधिकारी आयुषी सिंह यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नागपूर या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

Chandrashekhar Bawankule : विरोध पडला महागात, ठाकरे गटातील नेते भाजपमध्ये

नवीन नेमणूक

सी. के. डांगे यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर संजय कटकर यांची नियुक्ती महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे. याशिवाय, हिंगोली जिल्हाधिकारी असलेले अभिनव गोयल यांची बदली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

झालेल्या या बदल्यांमुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये आणि विभागांमध्ये प्रशासनिक कामकाजात नवे दृष्टिकोन व कार्यपद्धती येण्याची शक्यता आहे. स्थानिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाकडून वेळोवेळी अशा बदल्या केल्या जातात, ज्यामुळे विविध भागांतील योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्य होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!