प्रशासन

Shiv Sena Nagpur : रुग्ण सेवेसाठी समीर शिंदे सरसावले

Healthcare Chaos : सुपर स्पेशालिटीच्या शहरात सुपर समस्या

Share:

Author

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा-सुविधांमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुखांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मेडिकल हब म्हणून नावारूपाला आलेलं नागपूर शहर सध्या वैद्यकीय अडचणींच्या विळख्यात सापडलेलं दिसतंय. आयआयएम सारखी हॉस्पिटल्स आणि नामांकित सुपर स्पेशालिटी केंद्रांची मांदियाळी असलेल्या या शहराकडे केवळ विदर्भातूनच नव्हे, तर मध्यप्रदेशातील छिंदवाडा, आंध्रप्रदेशसारख्या शेजारील राज्यांतील रुग्णही उपचारासाठी येतात. परंतु, ही वैद्यकीय प्रगती सर्वसामान्यांसाठी आश्वासक ठरत नाहीये. विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (IGMC) या ठिकाणी रुग्णांची अवस्था अजूनही दयनीय आहे.

रुग्णांना उपचार मिळण्यात विलंब होतो, डॉक्टर अनुपलब्ध असतात, नंबर लागण्याच्या प्रतीक्षेत तासंतास रांगेत उभं राहावं लागतं, वीजपुरवठ्याचा प्रश्न तर नित्याचाच. या सर्व समस्यांमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आक्रमक झाली असून, शहरप्रमुख समीर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने थेट मेडिकल कॉलेजला धडक दिली.
या शिष्टमंडळाने अधिष्ठात्यांची भेट घेऊन रुग्णालयातील त्रुटींचा पाढा समोर मांडला.

Congress : मोदींना विचारणार ‘क्या हुआ तेरा वादा’?

30 मे 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार दक्षिण नागपूरमधील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता राज गजभिये यांच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान डॉक्टर अनुपलब्धता, वेळेवर सेवा न मिळणे, अपुऱ्या सुविधा, वीजपुरवठ्याचा बिघडलेला ताळमेळ, ओपीडीमध्ये रुग्णांना भेडसावत असलेल्या विविध असुविधांबाबत माहिती अधिष्ठात्यांना लेखी स्वरूपात देण्यात आली. अधिष्ठाता गजभिये यांनी शिवसेना शिष्टमंडळाच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत संबंधित अडचणी तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले.

Amol Mitkari : ओबीसी नेत्याने दादांच्या आमदाराला ‘बाजारू विचारवंत’ म्हणून डिवचलं

कायमस्वरूपी उपाय गरजेचे

प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख समीर शिंदे यांच्यासह राजेश रेवतकर, राहुल पांडे, रुपेश ठाकरे, प्रवीण कोहाड, चंदू राजूरकर, बंडू बेले, नागपुरे यांसारखे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या मुद्द्याची गांभीर्य लक्षात घेता, शिवसेनेचा पवित्रा केवळ एक राजकीय स्टंट नसून, जनतेच्या वेदना व्यक्त करणारा प्रयत्न वाटतो. कारण, ही पहिली वेळ नाही आहे जेव्हा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय व्यवस्थेबाबत तक्रारी आल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, एका रुग्णाला आवश्यक ती सुविधा न मिळाल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्येच मोठा गोंधळ घातला होता.

प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नागपूरकरांचा संताप उफाळून आला. अनेकांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली. विकसित शहरात असं वैद्यकीय चित्र नको, अशा भावना समाजमाध्यमांवर उमटल्या.या पार्श्वभूमीवर, नागपूरसारख्या प्रगत शहरात आरोग्यसेवेतील ढिसाळपणा ही निश्चितच चिंतेची बाब आहे. रुग्णांचा जीव गमावणं किंवा त्यांना अकारण त्रास सहन करावा लागणं, ही स्थिती बदलण्यासाठी केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना हवीत.

MSRTC : एका बाजूने वीज, दुसऱ्या बाजूने तिजोरीला गळती 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!