महाराष्ट्र

Bacchu Kadu : जलसमाधीच्या रूपात प्रहार कार्यकर्त्यांचा विरोध

Amravati : गुरुकुंजच्या भूमीत अन्नत्यागाचा शंखनाद

Author

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावतीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून प्रहार कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनही छेडले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तापत आहे. महायुती सरकारच्या सत्ता प्रस्थापनेनंतर शेतकऱ्यांच्या मनात मोठ्या अपेक्षा होत्या, पण प्रत्यक्षात या अपेक्षांना फळ मिळालेले नाही. कर्जमाफीच्या आशेवर अनेक अर्ज, मोर्चे, आणि आंदोलनं सुरू असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकही रुपया जमा झालेला नाही. या अपयशामुळे शेतकरी वर्गात वाढती निराशा आणि संताप दिसून येत आहे. या परिस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांनी गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

कडूंचे हे आंदोलन केवळ एका ठिकाणीच नाही तर पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या विश्रोळी येथील जलाशयात जलसमाधी आंदोलनानेही रंग घेतला आहे. ज्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणा ताणाखाली आली आहे. बच्चू कडू यांच्या आह्वानावर प्रहार पक्षाचे पंधरा ते वीस कार्यकर्ते धरणाच्या जलाशयात उभे राहून शेतकऱ्यांच्या मागण्या पुकारत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी, शेतमजुरांच्या हितासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील मजुरी वाढ, तसेच शेतमजुरांच्या अपघाती मृत्यूवर विमा संरक्षण देणे या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

Shalartha ID Scam : पासवर्डच्या एका क्लिकमध्ये कोट्यवधींची कमाई

शिवसेनेचा ठाम पाठिंबा

व्यतिरिक्त, सेंद्रिय खतांसह मेंढी खताला अनुदान देणे, दुधात भेसळ रोखण्यासाठी गायीच्या दुधाला 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रतिलिटर दर निश्चित करणे, तसेच कांद्याच्या दर स्थिर ठेवण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेणे या मागण्याही आंदोलनकर्त्यांनी मांडल्या आहेत.बच्चू कडू यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटाने प्रबल पाठिंबा दर्शविला आहे. दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांनी गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग उपोषणस्थळी भेट देऊन, आंदोलनाला पूर्ण ताकद देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या सोबत संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी देखील होते.

शिवसेना नेते गजानन लवटे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी बच्चू कडू यांच्या भेटीचे संकेतही दिले आहेत.परभणीच्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनीही आंदोलनाला पूर्ण समर्थन दिले असून, दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी 6 हजार रुपये मानधन देणे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे आणि शेतमालाला हमीभावावर 20 टक्के अनुदान देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे राज्यातील कृषी आणि सामाजिक राजकारणाला नवा वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्जमाफीची गुढी उभारण्यासाठी पुढील काळात राजकीय आणि प्रशासनिक स्तरावरही निर्णायक पावले उचलली जातील की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Akola : ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचली वीज पुरवठा अपयशाची झळ

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!