महाराष्ट्र

Bacchu Kadu : तुमचा बाप असेल मोदी पण जगाचा बाप शेतकरी आहे

Babanrao Lonikar : वादग्रस्त विधानानंतर भाजप नेत्याला घरचा आहेर

Post View : 39

Author

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ‘शेतकऱ्यांचे कपडे, चप्पल आणि मोबाईल आमच्या पैशावर चालतात’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारणात प्रचंड खळबळ उडाली.

राज्याच्या राजकारणात वादग्रस्त विधानांची नवीच शर्यत लागली आहे. कुणी कुणावर आरोप करतोय, तर कुणी जिभेवरचा ताबा गमावतोय. सध्या राज्यात शेतकरी प्रश्न, कर्जमाफी आणि सरकारविरोधी संताप पेटलेला असतानाच भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या एका विधानाने नवा वाद पेटला आहे. शेतकऱ्यांचे कपडे, चप्पल, मोबाईल आमच्या पैशातून चालतात हे शब्द लोणीकर यांनी उच्चारले आणि अक्षरशः राज्याच्या राजकारणात वीज चमकली. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेच देणारे हे विधान होतं, असं विरोधकांचं ठाम मत आहे. सोशल मीडियावर ही क्लिप वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या.

लोणीकर यांच्या या वादळात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि नेहमीच थेट भाषेत बोलणारे बच्चू कडूही उतरले. त्यांनी बबनराव लोणीकर यांना खरमरीत शब्दांत उत्तर दिले आहेत. आमच्या घामाच्या पैशावर देश चालतो. अन्नधान्य आम्ही पिकवतो. ‘आमच्या मतावर तुम्ही आणि तुमचा बाप निवडून येता आणि आमचाच बाप काढतोस? तुमचा बाप असेल मोदी पण जगाचा बाप शेतकरी आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. या प्रतिक्रियेसोबत त्यांनी एक तीव्र संदेश देणारे छायाचित्रही शेअर केले आहे. बच्चू कडू यांची शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी संघर्षाची भूमिका काही नवीन नाही.

Operation Thunder : गल्ल्यांतील अंधारावर खाकीचा वज्राघात

फडणवीसांची स्पष्ट नाराजी

नुकतेच गुरुकुंज मोझरी येथे त्यांनी आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले होते. सरकारच्या आश्वासनांनंतर त्यांनी आंदोलन थांबवलं असलं तरी, त्यांचा संघर्ष अजूनही कायम आहे. सोशल मीडियावर चार-पाच कार्टी आहेत, त्यांच्या मायचा पगार बबनराव लोणीकर यांनी केला. त्याच्या बापाचे पेन्शन मी केलं. मोदींनी ६ हजार रुपये तुझ्या बापाला दिले. आई, बहीण, पत्नीला लाडकी योजनेतून पैसे दिले. अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, पायावरची चप्पल आमच्यामुळे, हातातला मोबाईल आमच्यामुळे आणि तरी आमच्यावर तंगड्या वर करतोस, असे विधान लोणीकर यांनी केले. लगेचच त्यावर प्रचंड टीकेचा भडिमारही झाला.

सध्या राजकीय दबाव इतका वाढला की अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही स्पष्टपणे पुढे यावे लागले. त्यांनी सांगितले, कुठल्याही पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला अशा पद्धतीने बोलायचा अधिकार नाही. लोणीकर यांचं विधान पक्षाच्या नीतीला मान्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर नाराजी व्यक्त करत लोणीकर यांना इशारा दिला आहे. वाढत्या वादामुळे अखेर लोणीकर यांनाही माफी मागावी लागली.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आधीच पेटलेलं राजकारण, लोणीकर यांच्या वक्तव्यामुळे आणखी धगधगायला लागलं आहे. प्रश्न आहे तो इतकाच हे वादग्रस्त राजकारण शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत राहणार का? की खरोखरच कधी शेतकरी केंद्रस्थानी येणार?

Shalartha Scam : ओंकार अंजीकरच्या शिक्षण रॅकेटवर एसआयटीचा घाला

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!