महाराष्ट्र

Jejuri Accident: जखमींचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार

Ashadhi Vari : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मदतीची ग्वाही

Post View : 69555

Author

जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Vitthal Mandir : जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 15 ते 16 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. या दुर्घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी बावनकुळे यांनी शासन वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असून मृतांच्या कुटुंबियांनाही आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Parinay Fuke : विरोधकांचे गैरसमज विरले, दादांचे मुद्दे निर्णायक ठरले!

लाखो वारकरी

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह विविध दिंड्या भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत असताना जेजुरी येथे हा अपघात घडला. वारकऱ्यांचे सामान वाहून नेणाऱ्या ट्रकने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर बावनकुळे यांनी विठुरायाकडे सर्व वारकरी सुखरूप राहावेत, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा कधीही घडू नये, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. या अपघातामुळे वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात असून, जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जात आहे.

Akola : विकासाच्या मैदानात साजिद पठाण यांचा ‘रिपोर्ट कार्ड’

तपास सुरू

वारीसाठीच शिधा मटेरिअल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.  ट्रॅक्टर चालवणाऱ्याला तापाच्या गोळ्या घेतल्याने ग्लानी आली आणि त्यानंतर  त्याचा ताबा सुटला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे निष्पन्न झाले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. पोलिस याप्रकरणाचा तपास करीत आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. जेजुरीजवळच्या सासवडे गावात हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एक ट्रक अचानक दिंडीत घुसला. या दुर्घटनेत 15 ते 16 वारकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!