महाराष्ट्र

Sulbha Khodke : अमरावतीत माफियाराज थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आवाहन

Monsoon Session : सभागृहात पुन्हा उफाळला अमली पदार्थांचा प्रश्न

Author

गेल्या काही महिन्यांपासून विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एमडीसह अमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. जा मुद्दा आता थेट पावसाळी अधिवेशनात पोहोचला आहे. यावर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी विशेष मागणी केली आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचा वेग वाढत चालला आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये या अवैध धंद्याने जोर धरला आहे. पोलीस प्रशासन अनेक ठिकाणी कारवाई करत असले तरी, तरीही प्रभावी ठोस पावले उचलली गेली नाहीत. हेच कारण आहे की, या विषयावर राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही चर्चा रंगली आहे. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी या गंभीर समस्येवर प्रश्न उपस्थित केला आहे.  अमरावती शहरात एमडी ड्रग्स, गांजा आणि गुटख्याच्या तस्करीचा व्यापार इतका वाढला आहे की, शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात माफियांनी आपले राज्यस्थापन केले आहे.

गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असून, पोलिसांच्या संरक्षणाखालीही अवैध धंदे सुरू आहेत.सुलभा खोडके म्हणतात की, शहरातील गुन्हेगारीचा ग्राफ वेगाने वाढत चालला असून, एमडी ड्रग्ससारख्या खतरनाक अमली पदार्थांची तस्करी हेथील लोकजीवनाचा बळी घेतेय. अल्पवयीन मुलांचा वापर या अवैध व्यवसायासाठी होतोय, तर शाळा, महाविद्यालय आणि घराघरांपर्यंत या पदार्थांचा प्रसार होत आहे. अवैध दारू विक्रीसह गुटख्याची अनियंत्रित विक्रीही या समस्येचा भाग आहे. अनेकदा पोलिस कारवाया होत असल्या तरी, गुन्हेगार परत जामिनावर बाहेर येऊन पुन्हा गुन्हेगारी करत आहेत. खोडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील लक्ष वेधले आहे की, अमरावती पोलिसांना या प्रकरणात कडक आणि योग्य आदेश द्यावेत, ज्यामुळे या अवैध धंद्यावर अंकुश बसू शकेल.

सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव

स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या अनुचित प्रकारांवरही बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये अनेक बेरोजगार युवक-युवती गुन्हेगारीच्या कळीला जात असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अमरावतीत फक्त अमली पदार्थांची तस्करीच नव्हे, तर गल्लोगल्ली जुगार, सट्टा आणि क्रिकेट बेटिंगसारखे अवैध प्रकारही झपाट्याने वाढले आहेत. झटपट पैसा कमवण्याच्या लालसेत अनेक तरुण गुन्हेगारीच्या मार्गावर येत आहेत. याचबरोबर चोरीच्या घटनांचा वेगही शहरात वाढत असल्याने, या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सखोल बंदोबस्त आणि नियमित पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे, असे सुलभा खोडके विधानसभेत सांगितले.

Sanjay Khodke : विधान परिषदेत झळकली अमरावती आरोग्यसेवेची दीपज्योत

पोलिसांच्या सुरक्षिततेचीही चिंता वाढली आहे, कारण नुकतीच अमरावतीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांची हत्या करण्यात आली. अशा परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे गृह विभागाने अमरावतीच्या कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तत्परतेने आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी खोडके यांनी केली आहे.सुलभा खोडके यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी गेल्या पाच वर्षांपासून गृह विभागाकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. शहराचा विस्तार आणि वाहतुकीत वाढ लक्षात घेता, प्रभावी ट्रॅफिक व्यवस्था राबविणे हीही गरज आहे. या सर्व बाबतीत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक तोडगा काढावा, असा आग्रह त्यांनी उपस्थित केला.

अमरावतीसाठी कायदा सुव्यवस्थेच्या या समस्यांवर तातडीने उपाय न केल्यास, शहराच्या शांतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. सध्या जर योग्य कारवाई झाली नाही तर माफिया आणि गुन्हेगारांवर शासनाचा हात सैल होत असल्याची भावना पसरली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!