महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांचा ‘रामशास्त्री’ सुट्टीवर, गुंडाराज सुरू

Congress : गायकवाडांसारख्या वाचाळवीरांना सत्तेचाच पाठिंबा

Author

हर्षवर्धन सपकाळ यांनी एकाच वेळी अनेक मुद्द्यांना हात घालत, संजय गायकवाड, भाजपाची सत्ताधारी शैली, निवडणूक प्रक्रिया, दहशतवाद आणि कामगारांचे प्रश्न यावरून सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे.

सत्तेचा सत्तूर बनवून जर कोणी विधिमंडळाच्या दिवाणखान्यातच कायदा मोडत असेल, तर मग कायद्याच्या रक्षकांची भुमिका फक्त शोभेची ठेव झाली का? महाराष्ट्राच्या विधानभवनातील ‘कॅन्टीन मारहाणी’च्या घटनेनंतर विरोधकांचे घाव अधिक तीव्र होत चालले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज संजय गायकवाड यांच्यावर घणाघात करत भाजप आणि फडणवीस सरकारला थेट जबाबदार धरले. त्यांनी हा मुद्दा केवळ कॅन्टीनपुरता मर्यादित न ठेवता त्यातून सत्ताधाऱ्यांच्या वर्तनशैलीचा, गुन्हेगारीकडे झुकलेल्या मानसिकतेचा आणि एकूणच लोकशाहीच्या पतनाचा आरसाच समोर ठेवला.

संजय गायकवाड यांची ही मारहाणीची घटना काही पहिली नाही. याआधी त्यांच्या फोन क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. ज्यात त्यांनी फडणवीसांबद्दल अरेरावी करतानाचा अवमानकारक सुर दाखवला होता. त्यांचं राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला बक्षीस, कोविडचे जंतु फडणवीसांच्या तोंडात टाका, असे आक्षेपार्ह, भडक विधानं वारंवार ऐकायला मिळाली होती. हर्षवर्धन सपकाळ यांनी संतप्त शब्दात प्रश्न उपस्थित केला की, असा विछिप्त वाचाळवीर पक्षाच्या छत्रछायेखाली कसा टिकतो? फडणवीस यांची भूमिका देखील त्यांनी जोरदार टार्गेट केली. नेहमी रामशास्त्रीसारखा आव आणणारे फडणवीस हे सर्व आपल्या नाकाखाली घडू देतात. मग ते ‘रामशास्त्री’ आहेत की ‘गायकवाड राज’चे सहप्रवर्तक?

Sanjay Khodke : मनपाच्या रिकाम्या तिजोरीसाठी आमदाराने उठवला आवाज

महाराष्ट्र धर्म जपा

राज ठाकरे यांच्या भूमिकेवर भाष्य करताना सपकाळ म्हणाले की, मराठी अस्मिता जपणं योग्यच आहे. मात्र त्याच नावाखाली हाणामाऱ्या, दहशतवाद किंवा रस्त्यावरची गुंडगिरी चालणार नाही. मराठी माणूस संयमी आहे, सहिष्णु आहे. आपली संस्कृती ही शिवरायांच्या माफकतेतून व ज्ञानोबांच्या ज्ञानातून घडलेली आहे. ती विटाळण्याचा अधिकार कोणालाही नाही. राहुल गांधींच्या बिहार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बोलताना, सपकाळ यांनी आरोप केला की, महाराष्ट्रातील निवडणुकीत मतांची चोरी झाली होती, आणि त्याच पद्धतीचा प्रयोग आता बिहारमध्ये भाजप व निवडणूक आयोग करत आहेत. त्यांनी ही गंभीर बाब उचलून धरत म्हटले की, लोकशाहीचा पाया पारदर्शक निवडणूक असते, आणि जर आयोगच भाजपाचा मांडवली खेळ बनला, तर देशात हुकूमशाहीचं रूप दिसेल.

पुलवामाचा तपास गेला कुठे?

पुलवामा स्फोटाला सहा वर्षे झाली, तरी अद्याप कोणताही ठोस तपास समोर आलेला नाही. 40 जवानांचे बलिदान, 300 किलो स्फोटके आणि आता पहलगामच्या घटनेत 26 पर्यटकांचे हौतात्म्य, पण सरकारकडे कोणतीच ठोस माहिती नाही. हे दहशतवादी 300 किलोमीटर आत येतात, ठार मारून परत जातात आणि देशाचं गुप्तचर यंत्रणं काय करतंय? असा सपकाळ यांचा थेट सवाल होता. कामगारांचे मोर्चे, मागण्या, त्यांच्या व्यथा, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची स्पष्ट टीका त्यांनी केली. हे सरकार ना ऐकायला तयार आहे, ना बोलायला. त्यांच्या गप्पांची रसना फक्त उद्योगपतींशी चालते. जनतेसाठी ते मुकं, बहिरं आणि आंधळं झालं आहे.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या स्किल क्रांतीला परदेशातून बूस्ट

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!