महाराष्ट्र

Nana Patole : विदर्भाचे दुःख मुख्यमंत्र्यांनी दरबारात ऐकवलंच पाहिजे

Bhandara : वर्षानुवर्षे नुकसान सोसणारे कारधा गाव अजूनही वाऱ्यावर

Author

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः पूर्व विदर्भात गेल्या काही दिवसांपासून आसमंत अक्षरशः जलमय झाला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांना जबरदस्त तडाखा दिला आहे. वैनगंगा नदीने आपल्या पूरस्थितीचा कहर दाखवताना अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तोडला आहे. रस्ते बंद, घरांत पाणी, शेतपिकांचे नुकसान आणि जनजीवन ठप्प. हे दृश्य विदर्भातील अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या पाण्याने गावोगाव पसरलेल्या हाहाकाराची व्याप्ती खूपच मोठी आहे.

काही भागांत घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी घरातील साहित्य, धान्य वाहून गेल्याचे दिसून आले. भाजीपाला, धान, सोयाबीन आदी उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. चार दिवसांच्या पावसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात एकप्रकारचा वादळ उठले आहे. या भीषण स्थितीवर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उभे राहून विदर्भातील पूरस्थिती आणि मदतकार्याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही गावांमध्ये जीवितहानीच्या घटनाही समोर आल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट

गडकरींच्या उद्घाटनानंतर वाद

शासन नेमकी कोणती कार्यवाही करत आहे, हे लोकांना समजावे, यासाठी पारदर्शकतेची गरज आहे, असेही पटोले म्हणाले. दाभा, जमनी परिसरासह कारधा गावात दरवर्षी पूरस्थिती उद्भवत असताना सरकारकडून पुनर्वसनाचा मुद्दा दुर्लक्षितच राहिला आहे. नागरिकांचा थेट प्रश्न आहे दरवर्षी नुकसान सहन करणाऱ्या गावांना पुन्हा का वाऱ्यावर सोडले जाते? याच पावसात आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली आहे. भंडारा शहरातून वळविण्यात आलेल्या नूतन बायपास रस्त्याची पिचिंग अक्षरशः वाहून गेली आहे. तब्बल 735 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 बायपास रस्ता अवघ्या काही तासांच्या पावसातच निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड झाले आहे.

विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पाच दिवसांपूर्वीच या पुलाचे लोकार्पण झाले होते. मात्र उद्घाटनाआधीच पावसामुळे एका बाजूचा मुरूम, काँक्रीटसह रस्ता वाहून गेला होता. तरीसुद्धा उद्घाटन पार पडल्याने कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा पूल जर पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात कोसळू लागला, तर पुढील वर्षभर हा महामार्ग टिकेल का? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम केल्याचे समजते आहे. आता या कंपनीच्या कामावर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Corporate Elections : राज्यात लोकशाहीचा तीन अंकी खेळ सुरू

संपूर्ण पूर्व विदर्भ पुराच्या जबड्यात अडकलेला असताना, शासनाने मदतीचा हात उचलावा, अशा आशेने जनतेचे डोळे सरकारकडे लागले आहेत. संकटाच्या या काळात नुसती विधानं नाही, तर ठोस कृती हवी आहे. विदर्भाची ही सोंगटी स्थिती ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर प्रशासनाच्या हलगर्जीपणाचाही परिणाम आहे, हे विसरता कामा नये.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!