महाराष्ट्र

Nana Patole : विदर्भातील पूरग्रस्तांवर शासनाचे दुर्लक्ष नको

Bhandara : केंद्रीय मंत्र्यांचा बायपास पहिल्या सरीच्या पावसानेच खचला

Author

विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण होऊन पिकांचे, घरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वैनगंगा नदीने पूराची अवस्था निर्माण केली आहे. यामुळे अनेक महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गांना बंदी घालावी लागली आहे. राज्य सरकारने या परिस्थितीवर योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. पूर्व विदर्भात सातत्याने दोन ते तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे घरसाहित्य, शेतपिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक गावांमध्ये दोन गावांना जोडणारे रस्ते बंद झाले आहेत. तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चार दिवसांच्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक संकटाची भिती वाढली आहे.काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या गंभीर प्रश्नाला विधिमंडळात उठवून सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे पूरजन्य परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करत आहे. अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

Anil Deshmukh : जनसुरक्षा विधेयक विरोधकांना गप्प करायचं नवं औषध

लोकांमध्ये वाढलेली अपेक्षा

पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांना स्वच्छ पाण्याचा तुटवडा भासत आहे. साथीचे रोगही वेगाने पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही या परिस्थितीला तातडीने हाताळण्याची गरज आहे. याशिवाय, उन्हाळी धान खरेदीसाठी अद्याप सरकारकडून परवानगी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्रांवर ठेवलेले धान सडले असून त्याचे संपूर्ण नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणीचा सामना करावा लागत आहे, अशी चिंता नाना पटोले यांनी व्यक्त केली.भंडारा शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 735 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग 53 वर एक नवीन बायपास रस्ता तयार करण्यात आला आहे.

परंतु गेल्या चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे या बायपासच्या पिचिंगची अवस्था खालावली असून काही भागात तो वाहून गेला आहे. या रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काही  दिवसांपूर्वी झाले होते. उद्घाटनापूर्वीच आलेल्या पावसामुळे पिचिंग खराब झाली होती. पण तरीही लोकार्पण करण्यात आले. आता या पुलाच्या कामाची गुणवत्ता आणि बांधकाम कंपनीवर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे. या गंभीर परिस्थितीत शासनाने तातडीने पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदत करावी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि या महत्त्वाच्या रस्त्यांच्या गुणवत्तेवर योग्य नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांमध्ये वाढत आहे.

Vijay Wadettiwar : शालार्थ मधील भक्षक ‘वाघ’ पिंजऱ्यात टाका

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!