महाराष्ट्र

Bachchu Kadu : अंबोडा येथे हजारोंचा शेतकरी मेळा

Yavatmal : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बच्चू कडूंचा निर्धार

Author

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातबारा कोरा पदयात्रा सुरू केली आहे. ही पदयात्रा अंबोडा येथे पोहोचून भव्य सभेत रूपांतरित होत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे सातबारा कोरे व्हावेत, त्यांच्या मालाला हमीभाव मिळावा आणि दिव्यांगांना न्याय मिळावा, या न्याय्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुरू केलेली सातबारा कोरा पदयात्रा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या यात्रेचा सातवा दिवस 14 जुलै रोजी अंबोडा येथे एक भव्य सभा घेऊन शेतकरी चळवळीच्या दिशेने महत्त्वपूर्ण वळण घेणार आहे.

भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी, पापळ (अमरावती) येथून 7 जुलै रोजी या पदयात्रेला सुरुवात झाली. मागील सहा दिवसांत ही यात्रा उंबरडा बाजार, मानकीमार्गे वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज आणि चिलगव्हाणपर्यंत पोहोचत 138 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आहे. या प्रवासात हजारो शेतकरी हातात लाठ्या, काठ्या, विळा, रूमणे घेऊन सहभागी झाले आहे. त्यांचे हे उपस्थित राहणे केवळ आंदोलन नसून अन्यायाविरुद्धचा लढा आहे.

Nitin Gadkari : जनतेच्या प्रश्नांचं उत्तर सत्तेतून नव्हे, जनसंपर्कातून सापडतं

सभेला मोठी उपस्थिती

बच्चू कडू यांनी पदयात्रेदरम्यान केलेल्या घोषणांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मालाला शाश्वत हमीभाव, दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य, तसेच मेंढपाळ, मच्छीमार व ग्रामीण समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणं अपेक्षित आहे. शेतीची मरगळ, आत्महत्यांचा आलेख आणि शासनाच्या खोट्या गाजरगप्पा यामुळे त्रस्त झालेला ग्रामीण महाराष्ट्र प्रहारच्या या लढ्याभोवती एकवटत आहे. दिव्यांग बांधवांनी डोळ्यांवर काळी पट्टी बांधून अंबोडाकडे निघालेला मोर्चा या आंदोलनाचे प्रतीक बनला आहे. हा केवळ रास्ता नाही, तर ही एक सामाजिक जाणीव आहे. जी सरकारच्या असंवेदनशीलतेवर प्रहार करत आहे.

अंबोडा येथे होणाऱ्या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील आणि महाराष्ट्र भूषण सत्यपाल महाराज उपस्थित राहणार आहेत. या उपस्थितीमुळे या चळवळीला केवळ प्रहार पक्षाचाच नव्हे, तर इतर राजकीय व सामाजिक घटकांचाही सक्रिय पाठिंबा मिळताना दिसतोय. राज्यभरातून आलेल्या शेतकरी आणि दिव्यांग बांधव या सभेसाठी अंबोडा येथे एकवटले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सरकारविरोधात संताप आणि आत्मभानाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत आहे. अंबोडा येथील सभा केवळ राजकीय कार्यक्रम नसून, ती शेतकऱ्यांच्या पीळ भरलेल्या आवाजाची गगनभेदी साक्ष ठरणार आहे.

Parinay Fuke : क्राईम फाईटरला संसदेत पाहून आमदारांचा शब्दवर्षाव

दडपशाहीचा आरोप

यात्रेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांमध्ये पोलीस पाटील व स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून आंदोलकांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना धमकावले जात असल्याचे सांगण्यात आले. परंतु, शासनाच्या खोट्या व अपयशी धोरणांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता या लढ्यात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. ही पदयात्रा चिलगव्हाण येथे समारोपास येणार आहे. हे तेच गाव आहे, जिथे देशातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदली गेली होती. हा परिसर शेतकऱ्यांच्या वेदनांचा इतिहास मिरवतो. त्याच गावातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हक्कांचा आवाज सरकारच्या कानावर घालण्यासाठी ही पदयात्रा थांबणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!