महाराष्ट्र

Vidarbha : पूरग्रस्त लोकांसाठी प्रशासनाचा ‘रन फॉर रिलीफ’

Monsoon Session : गिरीश महाजन यांनी मांडली विदर्भातील नुकसानाची आकडेवारी

Author

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यामुळे अनेक जिल्ह्यांत जीवित, वित्तीय व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर घातले आहे. विशेषतः विदर्भ भागात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वैनगंगा नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये संपर्क तुटला होता. वाहतुकीच्या मुख्य मार्गांवर पुरामुळे अडथळे निर्माण झाले होते. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली होती. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाल्याने प्रशासनाला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने या परिस्थितीला गंभीरतेने घेतले असून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील विविध विभागांनी पूर परिस्थितीशी संबंधित बचाव व मदत कार्य तत्काळ आणि प्रभावी पद्धतीने पार पाडण्यासाठी विशेष निर्देश प्राप्त केले आहेत. विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागांमध्ये 8 आणि 9 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे आर्थिक आणि मानवी नुकसान झाले आहे. संबंधित प्रशासनाला नुकसानाचा सविस्तर आढावा घेण्याचे आणि तत्काळ मदत व पुनर्वसनाचे काम सुरळीतपणे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत 7 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे तर 4 लोक जखमी झाले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर जनावरेही या आपत्तीमध्ये दगावली आहेत.

Shivani Dani : तरुण नेतृत्वाच्या हाती विदर्भाची औद्योगिक भाग्यरेषा

पंचनाम्याचे काम सुरू

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, घरांचे नुकसान झालेल्या लोकांसाठी जिल्हा स्तरावर मदतनिधीचे वाटप सुरू आहे. गृहभांडी, कपडे, टपरीधारक आणि दुकानदारांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी मंजूर मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मदत वितरणासाठी आवश्यक अधिकारही देण्यात आले आहेत. ज्यामुळे मदत कार्य वेगाने आणि पारदर्शकपणे राबवता येईल. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या भागांतील 1 हजार 927 घरांना अंशतः आणि 40 घरांना पूर्णतः नुकसान झाले आहे.7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 4 जखमी असून 715 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

शेती क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून 20 हजार 854 हेक्टर जमिनीची हानी झाली आहे. या सर्वांच्या पंचनाम्याचे काम सुरू आहे. अमरावती विभागात देखील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे 180 घरांना अंशतः तर 9 घरांना पूर्णतः नुकसान झाले आहे. या भागात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. शेतकऱ्यांच्या 3 हजार 411 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. प्रशासनाने या नुकसानाचे वेळीच आढावा घेत, जलद मदत व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संपूर्ण परिस्थितीत प्रशासन आणि राज्य सरकार संकटमोचनासाठी सक्रिय आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पुरामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा वेळीच सामना करून सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा सातत्याने काम करत आहेत. नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Lohit Matani : ट्रॅफिकची पाठशाळा अन् शिस्तीच्या शिक्षकांचं ऑपरेशन ‘यु टर्न’

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!