अकोल्यातील भाजपमध्ये सध्या प्रचंड गटबाजी सुरू आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे.
अकोल्यात भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या प्रचंड अंतर्गत लाथाडी सुरू आहे. गटबाचीच्या राजकारणामुळेच भारतीय जनता पार्टीच्या चिथड्या उडाले आहेत. कुणाचा पायकोस कुणाच्या पायात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला लाजिरवाना पराभव स्वीकारावा लागला. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेते भाजपने अकोल्यामध्ये आणले. ज्यांच्या भरोशावरती संपूर्ण देशभरामध्ये भाजपने बहुमत मिळवले. पण आपल्या कर्मामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील, जागा भाजपने हातची गमावली. त्यानंतरही अकोल्या भाजपमध्ये गटबाजी थांबली नाही. अलीकडेच भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांचे चिरंजीव अनुप शर्मा यांना एका सेलची जबाबदारी देण्यात आली.
सेलची जबाबदारी म्हणजे अनुप शर्मा यांच्या वरती अन्याय असल्याची टीका भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केली. या संदर्भामध्ये द लोकहित लाइव्हने अत्यंत सडेतोडपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. सोशल मीडियावर व्यक्त झालेली नाराजी आणि अनुप शर्मा यांच्या नियुक्ती संदर्भातील द लोकहित लाइव्हचे दोन्ही वृत्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्णपणे वाचले. त्यानंतर त्यांनी कपाळावर हातच मारला. अकोला भाजपमध्ये हे नेमकं काय सुरू आहे, याची माहिती त्यांनी घेतली. यानंतर त्यांनी आपल्या टीमला निर्देश दिले की पुढील अकोला दौऱ्यामध्ये या सर्व विषयावरती अत्यंत गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे.
MLA Sajid Khan Pathan : अति उत्साहाला आवरण्याची जबाबदारी आता आमदारांवर
महानगरपालिका निवडणुकीस धोका?
चव्हाण यांच्या कार्यकाळातून कळले की, अकोला भाजपमध्ये सुरू असलेल्या प्रकाराबद्दल अनेकांनी आतापर्यंत लेखी तक्रार केली आहे. यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा खिसा आम्ही गरम करतो, असे काही नेत्यांचे कार्यकर्ते अकोल्यात खुलेआम बोलत फिरत आहेत. या विषयाची तक्रार देखील प्रदेश कार्यालयाकडे झाली आहे. इतकेच नव्हे तर नवीन अध्यक्ष झालेले चव्हाण यांनाही आम्ही खिशात घेऊन फिरतो, अशी ही वायफळ बडबड काही नेत्यांचे कार्यकर्ते गावात करत सुटले आहेत. आमचा नेता लवकरच मोठ्या पदावर जाणार आहे. त्यामुळे आमच्याशी पंगा घेऊ नका, असा धमकी वाला इशाराही भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना दिला जात असल्याचा प्रकार प्रदेश भाजपच्या कानावर आला आहे.
अकोल्यातील अती उत्साही आणि आगाऊ नेत्यांचा कार्यक्रम फिट करण्याची तयारी आता वरिष्ठ पातळी वरून सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा सविस्तर आढावा लवकरच घेण्यात येणार आहे. ठोस पुराव्यांसह होत असलेले या तक्रारींची दखल जर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही, तर आम्ही नेत्यांचे खिसे गरम करतो त्यामुळे ते आम्हाला काहीच बोलणार नाही, असा दावा जो नेत्यांच्या चट्ट्या भट्ट्यांकडून केला जात आहे, त्यामध्ये सत्य असेल असा संशय आता अकोल्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होऊ लागला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपने स्वतःच्या कर्माने स्वतःला मोर्णा नदीच्या गटारात नेऊन टाकले आहे. त्यानंतरही जर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अकोला भाजपमधील गटबाजी आणि त्यांना चांगुलकीचे व्यसन लावले नाही, तर आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाला पूर्णपणे ग्रहण लागेल यात शंकाच नाही अशी चर्चा आता भाजपच्या वर्तुळात आहे.
Nagpur Unique Festival : मारबतच्या छायेत महानगरपालिका युद्धाची झलक
