महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : मतचोरीच्या आरोपांचा केला चुराडा

Nagpur : काँग्रेसच्या ‘गद्दी छोड’ला बावनकुळेंचे सणसणीत उत्तर

Post View : 1

Author

नागपूरच्या राजकारणात काँग्रेसच्या ‘वोट चोर गद्दी छोड’ आंदोलनाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सणसणीत प्रत्युत्तर दिले. काँग्रेसवरच मतचोरीचा ठपका ठेवत त्यांनी सामाजिक सलोखा, शेतकरी कल्याण आणि विकासाची ठाम भूमिका मांडली.

काँग्रेसच्या ‘वोट चोर गद्दी छोड’ आंदोलनाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर देत काँग्रेसवरच मतचोरीचा ठपका ठेवला. कामठी येथील काँग्रेसच्या पदयात्रेच्या मार्गावरील मतदान केंद्रांवर काँग्रेसलाच सर्वाधिक मते मिळाल्याचा दाखला देत बावनकुळे यांनी काँग्रेसच्या आरोपांचा चुराडा केला. शुक्रवारी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सामाजिक सलोखा, शेतकरी कल्याण आणि विकासाच्या मुद्यांवरही ठामपणे आपली भूमिका मांडली. त्यांच्या शब्दांतून राजकीय परिपक्वता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आला.

काँग्रेसने कामठीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निषेध मेळाव्यात बावनकुळे यांच्यावर मतचोरीचा आरोप केला होता. या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत काढलेल्या पदयात्रेच्या मार्गावर काँग्रेसला मतांचे प्राबल्य मिळाले. बावनकुळे यांनी याच मुद्याचा आधार घेत काँग्रेसच्या दाव्यांना खोडसाळ ठरवले. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या भागातून काँग्रेसची पदयात्रा गेली, तिथे त्यांनाच सर्वाधिक मते मिळाली. यावरून मतचोरीचा खरा चेहरा कोणाचा, हे उघड होते, असे त्यांनी ठणकावले.

Atul Londhe : अजित पवारांच्या कथित धमकीवरून राजकीय वादळ

सामाजिक समतोल 

बावनकुळे यांनी सामाजिक सलोख्यावर भर देत कुणबी प्रमाणपत्राबाबतही स्पष्टता आणली. कोणत्याही समाजाचे आरक्षण हिसकावून दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. केवळ पुराव्यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, अन्यथा कोणत्याही दबावाखाली प्रमाणपत्र देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सामाजिक संभ्रम निर्माण करणाऱ्यांना त्यांनी खडसावले आणि ओबीसी समाजाला संभ्रमात न पडण्याचे आवाहन केले.

Mudhojiraje Bhosale : ओबीसीच्या गोंधळातून बाहेर पडा, मराठ्यांना स्वतंत्र हक्क द्या

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8 हजार हेक्टर जमीन परत मिळवून देण्याच्या निर्णयाचा विशेष उल्लेख बावनकुळे यांनी केला. हा निर्णय शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढवणारा असल्याचे सांगत त्यांनी फडणवीस सरकारच्या कृतीशीलतेचे कौतुक केले. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या संकल्पाला बळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्याय, शेतकरी कल्याण आणि विकासाच्या मुद्यांवर बावनकुळे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत काँग्रेसच्या आरोपांना खणखणीत उत्तर दिले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!