महाराष्ट्र

Maharashtra : मतचोरीच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?

Economic Policy : मोदी सरकारला घाबरवून राहुल गांधींची जीएसटी क्रांती

Author

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली. ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा वाद सातत्याने गाजत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर हल्ला चढवत मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात तब्बल 6 हजार 850 मतांची चोरी झाल्याचा पुरावा त्यांनी सादर केला आहे. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजीही राहुल यांनी असाच बॉम्ब फोडला होता. पण आता त्यांनी पत्रकार परिषदेत नव्या पुराव्यांसह भाजपला कोंडीत पकडले आहे. निवडणूक आयोगाच्या साथीने भाजपने सत्ता हस्तगत केली, असा थेट हल्ला त्यांनी चढवला. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळे उघडून सत्य पाहावे. त्यांच्याच पोलिसांनी मतचोरीप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. तरीही सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहण्याचा हा बेजबाबदारपणा आहे. फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असा घणाघात सपकाळ यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगावरही दुटप्पीपणाचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावर राजकीय नेत्याप्रमाणे वागण्याचा ठपका ठेवला. भाजप आणि नरेंद्र मोदी भारताला नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखे बनवू पाहत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांच्या स्थगितीवर हायकोर्टाचा सवाल

सपकाळांचा व्यापारी सन्मान

राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सातत्याने बोट ठेवले आहे. नोटबंदी, कोरोना संकट यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. ज्याची किंमत देशाला चुकवावी लागली. आता जीएसटी सुधारणेच्या मुद्द्यावरही राहुल यांनी आठ वर्षांपूर्वीच सुधारणेची मागणी केली होती. अखेर सरकारला त्यांच्या दबावापुढे झुकावे लागले. हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय आहे, असे सांगत सपकाळ यांनी 22 सप्टेंबर रोजी राज्यभर व्यापारी आणि दुकानदारांमध्ये पेढे वाटून हा विजय साजरा करण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकरी मुसळधार पावसाने उद्ध्वस्त झाले आहेत.

सपकाळ यांनी सरकारकडे सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये आणि खरडलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 5 लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी केली. तसेच, रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे, खते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणीही त्यांनी लावून धरली. दुसरीकडे, महायुती सरकारवर मराठी भाषेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठी ही केवळ भाषा नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती आणि धर्म आहे. तिसरी भाषा लादून भाजप भारताची विविधतेत एकता ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे, असे सपकाळ म्हणाले. डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा डाव असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्राच्या राजकारणात राहुल गांधी आणि काँग्रेसचा हा हल्लाबोल महायुतीला भलताच जड जाणार आहे. मतचोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठीच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन काँग्रेसने आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी काळात याचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!