महाराष्ट्र

Yavatmal NCP : साहेबांची तुतारी बाजोरियांनी केली परत

Sandip Bajoriya : काम करण्याची संधी नसल्याने बाहेर

Post View : 42

Author

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे. अशात यवतमाळात राजकीय घटना घडली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि आघाडी युतीमध्ये जागा वाटपावरून मतभेद आहेत. सुरू असलेल्या या राजकीय वादात माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी साहेबांची ‘तुतारी’ त्यांना परत केली आहे. पत्रकार परिषदेत घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहे. सध्या कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाहीत, असे बाजोरिया यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार संदीप बाजोरिया आणि त्यांची कठोर परिश्रम करण्याची वृत्ती नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असते. बाजोरिया स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र यवतमाळमध्ये अनेक जण त्यांना सत्य बोलणारा व्यक्ती म्हणून ओळखतो. पत्रकार परिषदेत बाजोरिया यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच फक्त आश्वासने दिली आहेत. परंतु कोणतीही जबाबदारी सोपवली नाही.

Yavatmal : राजकीय गणितांची नव्या आरक्षणावर फेररचना सुरू

काही शिल्लक नाही

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजीनामा देत त्यांनी सांगितले की, पक्षात काम करण्याची संधी नाही. जेथे कामाची संधी नसेल अशा पक्षात राहण्याचा प्रश्नच उरत नाही. करण्यासारखे काही नसेल तर उगाच थांबायचे कशाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला राजकारणात आणले होते. आता अजित पवार बाहेर पडले आहेत. आपण शरद पवार यांच्या सोबत राहिलो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्यापकपणे काम केले. मात्र आपल्यावर विश्वास दाखविण्यात आला नाही.

बाजोरिया यांच्याकडे आतापर्यंत यवतमाळमधील पक्षाचे प्रमुख नेते म्हणून पाहिले जात होते. निवडणूक प्रचार सुरू असताना बाजोरिया यांनी राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे. अशात माजी आमदाराने राजीनामा दिल्यानं यवतमाळमधील राजकीय गणितांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना बाजोरिया यांनी प्रश्न विचारला.

बाळासाहेब मांगुळकर यांनी आतापर्यंत जबाबदारी सांभाळल्या आहेत. त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख आणि वसंत घुईखेडकर यांच्यावरही टीका केली. जिल्हा बँकेतील पदांच्या भरतीवरही त्यांनी सडकून टीका केली. त्यामुळे बाजोरिया पूर्णपणे नाराजीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्याचं आता सिद्ध झालं आहे. साहेबांच्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर बाजोरिया दादांसोबत जाणार की अन्य कुणासोबत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!