महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आयसीयू मध्ये

Congress : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर राज्याच्या अधोगातीचा आरोप

Post View : 16

Author

राज्यात भ्रष्टाचाराचे महाभारत सुरू आहे, 27 लाख महिलांचे हक्क हिरावले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आणि कर्जबोजाने महाराष्ट्र आर्थिक दरीत ढकलला. विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या अपयशाचा पर्दाफाश करत सत्ताधाऱ्यांना अडचणीत टाकले आहे.

राज्यातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारवर घणाघाती आरोप करत सरकारला अडचणीत टाकले आहे. त्यांनी थेट सरकारवर निशाणा साधत म्हटले की, राज्यात भ्रष्टाचाराचे महाभारत सुरू आहे, 27 लाख महिलांचे हक्क हिरावले गेले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि सरकार केवळ दिखाऊ घोषणा करत आहे. महाराष्ट्र कधीही इतक्या भीषण आर्थिक संकटात नव्हता.

वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारत सांगितले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात 2हजार 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्याचा कर्जबोजा 2 लाख 59 हजार कोटींवर पोहोचला असून, इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र आर्थिक अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

Parinay Fuke : राइस मिलर्सशी संबंधित धमक्यांची क्लिप हाती

महिलांचे हक्क हिरावले

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपानुसार, राज्य सरकारने योजनांमधून 27 लाख महिलांचे नाव गायब केले. याचा थेट फटका गोरगरीब महिलांना बसला असून, त्यांच्या सशक्तीकरणाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या. सरकारने महिलांच्या हक्कांवर डल्ला मारत त्यांना योजनांपासून दूर ठेवले, हा उघड लुटमार असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवण्यात आले, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला. वडेट्टीवार म्हणाले, 2हजार 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण सरकारला काही फरक पडत नाही. शेतकऱ्यांना मदतीऐवजी निवडणूक तोंडावर ठेऊन खोट्या जाहिराती दाखवल्या जात आहेत.

वाढता कर्जबोजा

वडेट्टीवार यांनी सांगितल्या नुसार, राज्य सरकारच्या अपयशामुळे महाराष्ट्राचा कर्जबोजा 2लाख 59हजार कोटींवर पोहोचला आहे. एवढ्या मोठ्या कर्जामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया कमकुवत होत चालला आहे. सरकार भ्रष्टाचारात इतके बुडाले आहे की, राज्याच्या आर्थिक स्थैर्यावरच टांगती तलवार आहे.

भविष्याचा खेळ

विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, हे सरकार केवळ दिशाभूल करत आहे. महिलांना वंचित ठेवले, शेतकऱ्यांना संकटात ढकलले, आणि कर्जाच्या जाळ्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अडकवली. हा महाराष्ट्राच्या भविष्याचा खेळ आहे.राज्य सरकारकडून अजूनही या आरोपांवर कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विजय वडेट्टीवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!