महाराष्ट्र

Sanjay Khodke : अजित पवार गटातून विदर्भातील बड्या नेत्याला विधान परिषदेसाठी संधी

Maharshtra : पोट निवडणुकसाठी महायुतीचे पाच उमेदवार ठरले

Post View : 22

Author

विदर्भातील संजय खडके यांची अजित पवार गटाकडून विधान परिषद निवडणुकसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक रंगतदार वळणावर पोहोचली आहे. एकनाथ शिंदे गटानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. विदर्भातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या निवडणुकीत आता मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची 17 मार्च हा भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज दाखल करण्याची मुदत संपणार आहे, त्यामुळे सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मोठ्या उत्सुकतेनंतर अखेर अजित पवार गटाने संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय खोडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी ते अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Charan Waghmare : रेती चोरी थांबवा नाहीतर गुंडाराज येईल  

महत्त्वाच गणितं

भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत, तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. विधान परिषदेच्या पाच आमदारांनी विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत आणि त्या जागांसाठीच ही निवडणूक होत आहे.

सध्या महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, त्यांच्या संख्याबळाचा विचार करता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही तासांत अंतिम चित्र स्पष्ट होईल.

अजूनही संभ्रम

अजित पवार गटाने संजय खोडके यांना उमेदवारी दिली असली तरी गटात अजूनही काही नावे चर्चेत आहेत. संजय दौंड, झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नावांवरही चर्चा सुरू होती. अजित पवारांनी 16 मार्च रोजी बैठक घेऊन उमेदवार निवडीवर अंतिम चर्चा केली होती. त्यामुळे अजित पवार गटात आणखी काही राजकीय हालचाली होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

राजकीय समीकरण पाहता महायुतीकडे संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे त्यांचे उमेदवार सहज निवडून येतील, असे चित्र आहे. महायुतीने उमेदवार निश्चित केले असले तरी काही अपक्ष आणि छोटे पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 18 मार्च अर्ज छाननी होईल आणि त्यानंतर अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली जाईल.

एकूणच, विधान परिषद निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. पुढील काही तासांत राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!